ययाती
- समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.
- जग माणसाच्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालत माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य जी या जगात धडपड करतो ती भोगासाठी!
- मरण हाच जन्माचा शेवट असेल तर मनुष्य जन्माला येतोच कशाला ?
- दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
- लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.
- माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं
- त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , ते रणांगण आहे.
No comments:
Post a Comment