देवळात जाऊन मानसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून
काही न काही मागतात
चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कुणी वर चढताना दिसला कि
लगेच खाली ओढायला धावतो
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो
आठवणींच्या देशात मी
मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुश असत
येताना त्याला येववत नाही
तू मला स्वप्न दिलीस आणि
माझ्या रात्री जगायला लागल्या
आता चांदण्याही सवईन
सलगीन वागायला लागल्या
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार आठ आणे टाकून
काही न काही मागतात
चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कुणी वर चढताना दिसला कि
लगेच खाली ओढायला धावतो
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो
घरासाठी दोन जीवांचा
खराखुरा मेळ लागतो
आठवणींच्या देशात मी
मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुश असत
येताना त्याला येववत नाही
तू मला स्वप्न दिलीस आणि
माझ्या रात्री जगायला लागल्या
आता चांदण्याही सवईन
सलगीन वागायला लागल्या
No comments:
Post a Comment