8 Jun 2012

काहूर


या मनी तू तरी
फाटला उर का ?

पेटली आसवे
कोरडा धूर का ?

संगराच्या क्षणी
थांबला दूर का ?

तीळ गाली तुझ्या
आरसा चूर का ?

सोडला हात अन
आत काहूर का ?

No comments:

Post a Comment