मरताना वाटलं आयुष्य
नुसतंच वाहून गेलं
मला जगायचं,मला जगायचं
म्हणताना माझ जगायचंच राहून गेलं.
झेपेल तेवढंच दुखः
तो आपल्याला देतो
दिलेलं दुखः संपल कि
आपल्यालाच नेतो.
सरपणासाठी तोडलेल्या
ओंडक्याला एकदा पालवी फुटली
मलाच कळेना हि जगायची
जिद्द कुठली ?
बरसण्यासाची वेळ आली तर
आभाळही फितूर झालं
तेव्हा माझ गाव वेड
जळायला आतुर झालं.
इथे प्रत्येकाला ठाऊक आहे
प्रत्येकाचं गुपित
प्रत्येक जणच डागाळलेला
इथला चंद्र सुद्धा शापित.
नुसतंच वाहून गेलं
मला जगायचं,मला जगायचं
म्हणताना माझ जगायचंच राहून गेलं.
झेपेल तेवढंच दुखः
तो आपल्याला देतो
दिलेलं दुखः संपल कि
आपल्यालाच नेतो.
सरपणासाठी तोडलेल्या
ओंडक्याला एकदा पालवी फुटली
मलाच कळेना हि जगायची
जिद्द कुठली ?
बरसण्यासाची वेळ आली तर
आभाळही फितूर झालं
तेव्हा माझ गाव वेड
जळायला आतुर झालं.
इथे प्रत्येकाला ठाऊक आहे
प्रत्येकाचं गुपित
प्रत्येक जणच डागाळलेला
इथला चंद्र सुद्धा शापित.
No comments:
Post a Comment