18 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 💞भाग १४

थोड्या वेळानंतर

कॅफेचा वेटर हळूच पडदा सरकवतो.
मॅडम, अजून काही ऑर्डर देणार का?” तो विचारतो.

तो बघतो पण त्याला तिथे कुणीच दिसत नाही 

मग त्याची नजर जमिनीवर जाते —  “मॅडम?”

काव्या जमिनीवर पडलेली असते,
डोळे मिटलेले, चेहरा फिकट, आणि हाताजवळ फुटलेला मोबाईल.

सरसर!” तो घाबरत धावत बाहेर येतो.
सर! त्या केबिनमध्ये ती मुलगीती बेहोश पडलीये!”

मॅनेजर धावत येतो.
दोघं मिळून तिच्या नाडीवर हात ठेवतात.
“Pulse
खूप कमजोर आहेलगेच अँब्युलन्सला कॉल कर!”

वेटर फोन लावतो, आणि काही मिनिटांतच सायरनचा आवाज येतो.
रेस्टॉरंटमध्ये सगळीकडे गोंधळ माजतो.
काही लोक उठून बघायला लागतात.

काही मिनिटांनी

काव्याला स्ट्रेचरवर टाकून अँब्युलन्समध्ये घेतलं जातं.
मॅनेजर ड्रायव्हरला म्हणतो,
लवकर! जवळचं सिटी हॉस्पिटल!”

----

रुग्णालयात पोहोचताच गोंधळ माजला होता. नर्सेस धावत होत्या, डॉक्टर गंभीर चेहऱ्याने आदेश देत होते, आणि मॅनेजरचा जीव अक्षरशः हातात आला होता.

रिसेप्शनवर पोहोचताच तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला
प्लिज डॉक्टर! ही मुलगी अचानक बेशुद्ध पडली आहे, काहीतरी करा, लवकर!”

डॉक्टरांनी स्टेचर आणायला सांगितलं.
तीला लगेच इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं.
पण उपचार सुरू करायच्या आधी डॉक्टर थांबले
आम्हाला पोलिस रिपोर्ट शिवाय पुढचं काही करता येणार नाही. केस डाऊटफुल आहे,” डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले.

मॅनेजर विनवणीच्या सुरात म्हणाला,
सर, मी सगळी प्रोसेस हाताळतो, तुम्ही फक्त तिचं प्राण वाचवा. प्लिज!”

डॉक्टर काही क्षण विचारात पडले.
तिच्या शरीरावर पडलेले ओरखडे, फुटलेला फोन, आणि तिची हालत पाहून त्यांना परिस्थिती गंभीर वाटली.
ठीक आहे,” त्यांनी स्टाफकडे वळून सांगितलं, “ट्रॉमा केअर सुरू करा. आधी स्टेबल करा.”

ताबडतोब डॉक्टरांची टीम तिच्यावर काम सुरू करते.
सलाईन, ऑक्सिजन मास्क, हृदय मॉनिटर
मॉनिटरवरील रेषा काही वेळ स्थिर राहतात, मग पुन्हा मंद लयीत हलतात.
डॉक्टर शांतपणे म्हणतात — “BP खूप लो आहे… Pulse मंद आहे… We might lose her if she doesn’t respond in 10 minutes.”

मॅनेजर बाहेर उभा, घामानं निथळलेला.
तो सतत रिसेप्शनवर पोलिसांना फोन करत राहतो.

काही वेळात पोलीस हॉस्पिटलमध्ये येतात.
ड्युटी इन्स्पेक्टर रेकॉर्ड बुक हातात घेऊन विचारतो
काय झालंय इथे?”

मॅनेजर सगळं सांगतो
कसा ती केबिनमध्ये एकटी होती, कसं तो आवाज ऐकून आत आला आणि ती बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पोलीस तिचा मोबाईल ताब्यात घेतात.
फोन पूर्ण फुटलेला असतोस्क्रीनचे तुकडे आणि सर्किट वेगळं झालेलं.
तरीही त्यांना सिमकार्ड मधून घरचा नंबर मिळतो आणि ते काव्याच्या घरच्यांना संपर्क करतात.

थोड्याच वेळात तिची बहीण आणि आई हॉस्पिटलमध्ये पोहोचतात.
डॉक्टर त्यांना बाजूला घेऊन सांगतात
ती सध्या अजून शुद्धीवर आलेली नाही. आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, पण तिच्या मेंदूवर शॉकचा परिणाम झालाय.
ती कोणत्याही क्षणी कोमामध्ये जाऊ शकते…”

आईच्या हातातून पर्स खाली पडते.
डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
माझी मुलगीकाही तरी करा डॉक्टर, प्लीज…” ती ओरडते.

डॉक्टर गंभीरपणे मान हलवतात.
आम्ही प्रयत्न करतोय, पण पुढची काही क्षणं खूप महत्त्वाची आहेत.”

हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्या क्षणी फक्त मशीनचा आवाज, डॉक्टरांचे आदेश आणि आईच्या रडण्याचा प्रतिध्वनी घुमत राहतो.
आणि आतकाव्या जणू काळोखात हरवत चालली असते

----

हॉस्पिटलमध्ये काव्याची अवस्था अजूनही गंभीर होती.
डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं — ती सध्या अजून बेशुद्ध आहे, पण तिच्या मेंदूची activity मंदावते आहे. आम्ही प्रयत्न करतोय, पण ती कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे.”
कॉरिडॉरमध्ये तिची आई खुर्चीला टेकून बसली होती.
डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि हात जोडून केलेली देवाजवळची प्रार्थनात्या क्षणी तिच्याकडे शब्द नव्हते, फक्त भीती होती.

---

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला.
इन्स्पेक्टर काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट नोंदवत होता
कॅफेचं लोकेशन, स्टाफचे स्टेटमेंट्स, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CCTV फुटेज.

“Camera number four, timestamp 6:42 PM — चला मागे फिरवा,” तो ऑपरेटरला म्हणाला.
स्क्रीनवर कॅफेच्या केबिनचा कोन दिसू लागला.
काव्या एकटी बसलेली, थोड्या वेळानं एक मुलगा आत येतो.

“Pause करा… zoom करा थोडं.”

झूम होताच चेहरा स्पष्ट झालाइन्स्पेक्टरने भुवया उंचावल्या.  -  “हे कोण?”

मॅनेजर थोडं संकोचत म्हणाला, “सर, हेच तेतीच्याबरोबर बसलेले होते त्या दिवशी.”

इन्स्पेक्टरने फुटेज पुन्हा चालवलं.
तो केबिनमधून उठून जातो, आणि काही मिनिटांनीकाव्या खाली कोसळते.
टाइमस्टॅम्प नोट करा,” इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाला, “6:56 PM.”

----

काही तासांनंतर समरला पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं.
तो स्वतःहून आलाडोळ्यात थकवा, पण भीती नव्हती.

इन्स्पेक्टरने फाईल उघडली,
समर शिर्के पाटील  — काव्या काळे हिच्या केसबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का?”

समर शांतपणे म्हणाला,
सर, होमला माहिती आहे काय झालंय, पण मी काही चुकीचं केलं नाही.”

त्या दिवशी तू तिच्यासोबत कॅफेत होतास?”
हो, पण ती मला शरयूच्या नावाने मेसेज करून बोलावलं होतं.
मला वाटलं शरयू भेटायला येणार आहे. पण तिथे काव्या होती.
तीने मला तिचं प्रेम सांगितलंआणि मी तिला स्पष्ट सांगितलं की माझं आणि शरयूचं नातं ठरलेलं आहे.
ती रडली, भावनिक झाली, पण मी तिला काहीही केलं नाही सर.
मी फक्त तिथून निघालो.”

इन्स्पेक्टर काही क्षण शांत राहिला.
त्याच्या चेहऱ्यावर संशय आणि विचार एकत्र दिसत होते.
तू म्हणतोस तसं CCTV वर पण दिसतंय,” तो म्हणाला, “तू बाहेर गेलास आणि काही मिनिटांनी ती पडली.”

समरने शांतपणे मान हलवली.
मला माहीत आहे सरपण ती का पडली, काय झालं, मला काही कळलं नाही.”

इन्स्पेक्टर त्याच्याकडे एकटक पाहत राहिला.
समोर बसलेला मुलगा सत्य बोलतोय का, हे त्याच्या चेहऱ्यावरून वाचायचा प्रयत्न करत होता.
समरचा आवाज स्थिर होता, चेहऱ्यावर पश्चात्तापाची झलक मात्र होती.

ठीक आहे,” इन्स्पेक्टर शेवटी म्हणाला, “सध्या तरी तुला जाऊ देतो. पण केस संपलेली नाही.
हॉस्पिटलमधून तिचा रिपोर्ट आला की पुन्हा बोलावू.”

समर उठला, हळूच म्हणाला — “सर, मी काही चुकवलं नसेल, पण काही उपयोगी पडेल असं काही असेल तर मला नक्की कळवा.”
इन्स्पेक्टरने त्याच्याकडे मान डोलावली.

त्या रात्री हॉस्पिटलमध्ये
काव्याचं शरीर अजूनही निश्चल.
मॉनिटरवरील बीपचा आवाज मंदावत होता.
डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं
“Brain activity weak
होत चालली आहेती कधीही कोमामध्ये जाऊ शकते.”

आईचा हात तिच्या हातात होता
थरथरता, थंड आणि थकलेला.
डोळ्यातून अश्रू गालावरून ओघळले.

बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मात्र इन्स्पेक्टर उभा होता
हातात रिपोर्ट्स, मनात संशय.
कारण CCTV मध्ये दिसलेलं आणि समरचं म्हणणं दोन्ही जुळत असलं तरी खरं काय घडलं हे फक्त काव्याचं सांगू शकतं होती

-----

हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये गोंधळ सुरू होतातेवढ्यात शरयू धावत आली. श्वास लागलेला, डोळे पाणावलेले.

काव्याकाय झालं माझ्या काव्याला?” ती किंचाळलीच जवळजवळ.

मॅनेजरने तिला धरून शांत केलं. “मॅडम, ती कॅफेत होती... अचानक बेशुद्ध पडली. आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये आणल. डॉक्टर म्हणतायत, तिची स्थिती गंभीर आहे.मेंदूला धक्का बसला आहे, आणि ती कोमात जाण्याची शक्यता आहे. पण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत.”

शरयूच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. “कोमात? पण असं काय झालं की ती असं झाली?” ती थरथरत्या आवाजात म्हणाली.

तेवढ्यात मागून पोलीस इन्स्पेक्टर आले.
मिस शरयू?” त्यांनी विचारलं.
हो, मीच,” ती गोंधळून म्हणाली.

कॅफे मॅनेजरने सांगितलं की तुम्ही आणि ही काव्या दोघी जवळच्या मैत्रिणी आहात. आम्हाला थोडी चौकशी करायची आहे.”  शरयूने मान हलवली, अजूनही काव्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती .

इन्स्पेक्टर पुढे म्हणाले
आम्ही कॅफेचं CCTV फुटेज पाहिलं आहे. त्या केबिनमध्ये तिच्यासोबत एक व्यक्ती होतीसमर शिर्के पाटील .”

शरयू दचकली. “काय? समर? पण... तो तर माझा... माझा fiancé आहे. तो काव्याला भेटायला का गेला होता?”

इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले,
तेच आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. फुटेजमध्ये दिसतंय की तो तिथून काही मिनिटांनी बाहेर पडतो, आणि लगेचच ती जमिनीवर कोसळते. आम्हाला माहित नाही अजून नक्की काय घडलं, पण...”

शरयूचा मेंदू रिकामा झाला. तिचं शरीर थरथरायला लागलं.
समर आणि काव्या... माझ्यापासून काही लपवत होते का?” तिच्या मनात विचारांची गर्दी झाली.
ते दोघं एकत्र का भेटले? आणि असं काय झालं की काव्या बेशुद्ध झाली?”

ती हळूच काव्याच्या पलंगाजवळ बसली.
काव्या... डोळे उघड ना. एकदाच सांग, काय झालं होतं...” ती रडत पुटपुटली.

काव्या शांत होती. मॉनिटरच्या बीपचा आवाजच एकमेव प्रतिसाद.
आणि शरयूच्या डोळ्यात आता फक्त दोन गोष्टी दिसत होत्या
संशय... आणि वेदना.

 

 

- @ सौरोहिणी माने