घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी
चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे
निवांत
आकाश तेजभारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे
वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो
बिचारा
जलधी बरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे
सानिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ न कुणाची अस्तित्व
सावराया
- वि दा करंदीकर
प्रस्तुत कविता विंदा यांची नसून विद्याधर सीताराम करंदीकर यांची आहे !
ReplyDeleteप्रस्तुत कविता विद्याधर सीताराम करंदीकर यांची आहे !
ReplyDeleteखूप छान कविता आहे ,
ReplyDeleteसारखी गुणगुणावी वाटते ...