8 Jun 2012

जीवनसाथी

जीवनात कोणीतरी हक्काचा असावा
वेळप्रसंगी सावधान करणारा असावा
चुकले कधी कोणीही
मोठ्या मनाने माफ करणारा असावा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तो माझ्या सोबत असावा
काटे रुतले तरीही फुल समजून
त्यावर चालणारा असावा

माझ्या सुखात स्वतःचे सुख
मानणारा असावा
दुखाःतही तोच डोळे
पुसणारा असावा

जीवनात कोणीतरी
रंग भरणारा असावा
मी कोरा कागद तर
तो चित्रकार असावा

अशा व्यक्तीची मी वाट पाहते
तोच माझा जीवनसाथी असावा
संपूर्ण आयुष्यात तो सोबत असावा
मी कविता तर तो माझा कवी असावा .

No comments:

Post a Comment