हा गंध फुलांना आला
काळोख पारखे पक्षी
झुलती केशर झुला ....
व्याकूळ पाऊल वाटा
अधिरलेले अरण्य
रानभर सांडलेले
केव्हाचे प्रकाश पुण्य ....
गवत मलमली थोडे
मधाळ हसले तेव्हा
छेडून लाघव शिळ
थिरकला रानरावा ....हि दिसते पाऊल खूण
कोण सखी हि गेलेली
हळूच लावण्य शिंपून ....
पहाट कांचन गौर
हळूच सकाळ होते
गंधल्या रानवाटेत
मी प्रकाशगीत गाते .....!
No comments:
Post a Comment