कोल्हापुरातील
शिर्के पाटलांचा थाट म्हणजे एकदम वेगळाच होता, संपूर्ण शहरात ज्यांचं नाव घेतलं की
आदर आणि धाक दोन्ही जागेवर उभा राहत होतं ते म्हणजे - "समर शिर्के पाटील" सहा फूट उंची, गौरवर्ण,
व्यायामाने कमावलेलं कसदार शरीर, नजरेतून बोलणारा देखणा चेहरा, कोल्हापूरचा रांगडेपणा
नसानसात भिनलेला, असं रुबाबदार व्यक्तिमत्व.
गारमेंट फॅक्टरी चा मालक असूनही तो फार साधा शिस्तप्रिय
आणि कडक स्वभावाचा होता थोडकं बोलणं आणि नजरेतला धाक हे सगळं काही त्याला इतरांपेक्षा
वेगळं ठरवत होतंं, पण या कडक व्यक्तिमत्वामागं एक भक्त मन होतं दरवर्षी गणपतीच्या दिवसात
तो आणि त्याचा लहान भाऊ प्रताप स्वतःचे गणेश मंडळ चालवत, ज्यात ढोल ताशांच दमदार पथक
असायचं, स्वतःच्या व्यवसायाच्या व्याप दोन महिने बाजूला ठेवून मंडळासाठी स्वतःला झोकून द्यायचा.
शरयू रामराव
ठाले पाटील - गोरीपान, चेहऱ्यावर चिमुकलं हास्य कायम असायचं आणि बोलण्यातली ओघवती गोडी,
कोणालाही मोहात पाडणारी, तिच्या डोळ्यात जग पहायची उत्सुकता.
लहानपणापासूनच
ढोल वाजवायची तिची खूप इच्छा होती, तिची जिवलग मैत्रीण काव्या तिला समरच्या मंडळाबद्दल
सांगते.
शरयूच्या
मनात उत्साह दाटला, तिने घरी परवानगी मागितली, घरच्यांनी आधी नाही म्हटलं पण ती हट्टान
आणि प्रेमानं समजावत राहिली, शेवटी - वेळेवर घरी येण्याच्या अटीवर घरच्यांनी परवानगी दिली.
दुसऱ्या दिवशी
नोंदणीचा शेवटचा दिवस होता, कॉलेज सुटल्यावर शरयू आणि काव्या दोघी मंडळाच्या कार्यालयात
पोहोचल्या.
आत प्रताप
बसलेला होता काव्या - "दादा ही माझी मैत्रीण आहे हिला पण ढोल वाजवायचा आहे"
प्रतापने
समोर ठेवलेल्या रजिस्ट्रेशन लिस्ट कडे बघितलं आणि डोकं हलवत म्हणाला - "सॉरी पण
आता सगळे ढोल बुक झालेत, एकही ढोल शिल्लक नाही. "
हे ऐकून शरयुचा
चेहरा पडला, पण तिचा नाद कुठे थांबणार होता? "प्लीज एक तरी द्या ना मला खूप दिवसापासून
इच्छा आहे ढोल वाजवायची. "
हे सगळं मागच्या
खुर्चीवर शांत बसून समर पाहत होता, तो फारसा बोलणारा नव्हता पण समोरच्या मुलीचे गोड
रूप, तिच्या ओठांची नाजूक लय, अधून मधून डोळ्यावर येणारे केस, काना मागे सारताना होणारी
लाघवी हालचाल, त्याला पहिल्याच नजरेत काहीतरी वेगळं स्पर्शून गेलं.
शरयू अजूनही
प्रताप समोर आग्रह करत होती. प्रताप गोंधळतो.
त्या क्षणी
मागून आवाज येतो - "तो कोपऱ्यातला ढोल दे तिला. "
प्रताप आश्चर्याने
मागं पाहत म्हणतो - "अरे दादा तो तर तुझा
आहे ना? "
समर शांतपणे
- "मिरवणुकीच्या दिवशी थोडावेळ वाजेल मी....., वाजवू दे तिला. "
शरयूने
चमकून हसत डोळ्यांनी आभार मानले. तिचं ते पहिलं हसू
समरच्या हृदयात सरळ ठसा उमटवत गेलं.
समरने प्रतापला हात हलवत तिचा फॉर्म भरून घ्यायला सांगितलं.
प्रताप न
फॉर्म दिला, शरूने तो पटकन भरला.
प्रतापने
आश्चर्याने फॉर्मवरचं नाव वाचलं - "शरयू रामराव ठाले-पाटील" तो हसत म्हणाला
- "फक्त ठाले लिहिलं असतं तरी चाललं असतं. "
शरयूने डोळ्यात
चमकं आणतं उत्तर दिलं - "नाही रे दादा पाटील हे फक्त नाव नाही तो एक रुबाब आहे,
पाटील म्हटलं की लोकांच्या नजरेत वेगळाच आदर दिसतो. "
मागे बसलेला
समर तिचा प्रत्येक शब्द टिपत राहतो, तिचा आवाज, तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास, त्याच्या
मनावर ठसा उमटवत होता.
तो अचानक हात वर करून - "ओ ठाले पाटील जरा दमानं घ्या,
अजून खूप लांब जायचंय आपल्याला, आता तो ढोल घ्या आणि ग्राउंड वर निघा....."
शरयूने थोडं
तोंड वाकड केलं तिचा तो चेहरा पाहून समरच्या ओठावर नकळत हसू उमटलं.
त्या दोघी
मैदानाकडे चालू लागल्या, रस्त्यात काव्या विचारते- "तोंड वाकड का केलंंस ग?
शरयु थोडी
चिडून - "मग काय केवढ्या रुबाबात बोलले ते .... "
काव्या डोळे
मोठे करत म्हणते - "तुला माहिती का कोण होते ते? समर भैया शिर्के पाटील, हे सगळं
मंडळ त्यांचच आहे, आणि तू मात्र त्यांच्यासमोर बसून त्यांनाच पाटीलकीचा रुबाब समजावते.
" "खूप स्ट्रिक्ट आहेत ते, त्यांना उशिर अजिबात चालत नाही, ढोल वाजवताना
कोणी टाईमपास केला, आळस केला, कुणी चुकलं तर सगळ्यांसमोर ओरडतात त्यांच्या नजरेचा धाकच
वेगळाच आहे." असं बोलत दोघी मैदानावर पोहोचल्या होत्या.
- @ सौ. रोहिणी
माने
माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग २
- @ सौ. रोहिणी माने
No comments:
Post a Comment