11 Oct 2025

माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ३

 कॉलेज सुटलं होतं, शरयू नेहमीसारखी ढोल च्या प्रॅक्टिस ला जायचं म्हणून बसस्टॉपवर बस ची वाट बघत उभी होतीसमर पण फॅक्टरी मधून प्रॅक्टिस साठी निघाला होता,श्रावणातल्या अबोल पावसाची भुरभुर सुरू झालेली, रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट सुरु होता. सिग्नल क्रॉस केला तस त्याचं लक्ष बसस्टॉप वर उभ्या असलेल्या शरयू कडे गेलं, पावसामुळे  बसस्टॉप च्या कोपऱ्यात शरयू अवघडून उभी होती आकाशी रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची लेगीज, चेहऱ्यावरून ओघळणारं पावसाचं थेंब तिच्या निरागस रुपाला आणखी उजळवत होते. वाऱ्यात उडणारे केस ती वारंवार हाताने कानामागे सारत होती. तीच लोभस रूप बघून तो बघतच राहिला, पण त्याने अचानक गाडी थांबवल्यामुळे, मागचे गाडीवाले चिडून हॉर्न वाजवू लागले, तशी त्याची तंद्री भंगली आणि तो भानावर आला, त्यानं गाडी बाजूला घेत खिडकीतून हात बाहेर काढत तिला आवाज दिला -

 ओ ठाले पाटील, चला…”

 त्याचा आवाज एकूण तीन चमकून गाडी कडे पाहिलं  सर, तुम्ही?”

 

हो, चल. मी पण ग्राऊंडवरच चाललोय. सोबत जाऊ.”

नको सर, तुम्ही जा. मी बसने येते आणि हो वेळेवर पोचेन. Don’t worry.” ती  त्याला टोमणा मारत नकार देते. (कारण दोनच दिवसा पूर्वी तो उशीर झाला म्हणून तिला बोललेला असतो.)

 

त़ो हळूच हसला.

ठाले पाटील, घाबरता का तुम्ही मला? की राग आलाय?”

 

ती गडबडून —

नाही नाही, असं काही नाही सर…”

 

त्याचा आवाज अचानक कठोर होत़ो.

बस पटकन. उशीर होतोय.”

 

त्याच्या आवाजातला ठामपणा ऐकून ती दचकल्यासारखी होते .

आणि न बोलता गाडीत जाऊन बसते.

---

 

गाडी सुरू झाली.  पावसाचे थेंब तिच्या केसांत अडकून चेहऱ्यावरून ओघळत होते.

त्याने मागच्या सीटवरून एक नेपकीन तिच्यासमोर धरला.

 

हं, डोकं पुसून घ्या.”

 

नको सर, माझ्याकडे स्कार्फ आहे. मी पुसते.”

ती तोंड वाकडं करत म्हणाली.

 

स्कार्फ काढून ती केस पुसू लागली.

तिचे गुलाबी गाल अधिकच खुललेले पाहून त़ो नकळत हसला.

(गाडीत "टुं टुं" असा सीटबेल्टचा आवाज सुरू होतो.)

"हा कसला आवाज येतोय गाडीत? काही बिघडलंय का?" – ती.

"गाडी बिघडली नाहीयेतू seatbelt लावला नाहीयस म्हणून आवाज येतोय." – त़ो.

ती seatbelt लावायचा प्रयत्न करते पण पट्टा अडकतो, नीट लागत नाही. तिची धडपड पाहून त्याला हसू आवरत नाही.

थांब , मी करतो…” समरने हलक्या आवाजात म्हटलं.

तो पुढे सरसावला.
त्याचा हात सीटबेल्टला धरून हलकेच तिच्या खांद्यावरून ओढू लागला.
तो झुकताच तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला.

क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं.
शरयूच्या श्वासाचा उष्णपणा त्याला जाणवलामंद, गोड सुगंधाने त्याचा श्वासच रोखून धरला.
तिचे केस हलकेसे त्याच्या गालाला स्पर्शून गेले.

ती थोडी घाबरली, पण नजर खाली झुकवण्याऐवजी  नकळत त्याच्या डोळ्यांत पाहू लागली.
त्या नजरेत एक बोललेलं आकर्षण होतंजे शब्दांत व्यक्त करता येणार नव्हतं.

सीटबेल्ट क्लिक होऊन लॉक झाला, पण समरने हात मागे घेतला नाही.
तो अजूनही तिच्याच जवळ थांबला.
त्याच्या ओठांवर एक हलकं हसू होतं – “झालं …” समर.

शरयूचा श्वास अजूनच जलद झाला.
ती काही बोलली नाही, फक्त लाजेने हळूच मान खाली घालून खिडकीकडे पाहू लागली.

पण दोघांच्याही मनात एकच विचार होता
हा क्षण अजून थोडा थांबला असता तर किती बरं झालं असतं

----

तो एक हात खिडकीवर ठेवून मधेमधे तिच्याकडे बघत गाडी चालवू लागला .

शरयू मात्र जणू सावरूनच बसली होती.

थंड हवा लागल्याने तिला शिरशिरी आली. त्याच्या लक्षात येताच त्याने एसी बंद केला. गाडीत क्षणभर शांतता पसरली. 

गाडी पुढे सरकत होती.     पावसाचे थेंब अजूनही काचांवर आपटत होते.
गाडीतली शांतता शरयूला जड वाटत होती.


समरनं स्मित करत विचारलं
माझ्याकडे पाहणं इतकं अवघड आहे का? की समोर पाहिलं की परत राग आठवतो?”

रेडिओवर मंद स्वरात गाणं वाजत होतं. - (असे कसे बोलायचे बोलता आता…… तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता….. डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता…… सांगा जरा असे कसे लपायचे रे आता….. मन धागा धागा जोडते नवा...)

शरयू खिडकीकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला जाणवत होतंसमर तिच्याकडे चोरून पाहतोय.

काय बघताय एवढं?” तिनं हसत विचारलं.

तो हलकासा गोंधळला, हसला.
काही नाहीपावसातला रंग तुला जास्त शोभतोय एवढंच.”

शरयू गप्प झाली. गालावरची लाज टाळण्यासाठी ती पुन्हा बाहेर बघू लागली.
पण तिच्या मनात शब्द घुमत होते.

---

 

थोडं पुढे जाताच समरने गाडी एका रेस्टॉरंटसमोर थांबवली.

Sir, आपल्याला तर ग्राऊंडवर जायचं होतं ना?”

ती गोंधळून विचारते.

 

हो, जायचंच आहे. पण भूक लागलीये,थोड खाल्लं तर चालेल ना? .”

 

शरयू मनाशीच कुजबुजली —

(जणू मी नाही म्हटलं तर काही खाणारच नाहीत!)

 

तो पुन्हा ठाम आवाजात म्हणाला —

चला, लवकर. उशीर होतोय.”

 

परत त्याच्या आवाजातलं गांभीर्य ऐकून ती घाईत उतरली.  त्याच्या मागे रेस्टॉरंटमध्ये आली.

---

दोघं टेबलावर बसले.

समरने मेन्यू कार्ड हातात घेतलं आणि विचारलं —

काय काय आवडतं तुला?”

 

ती त्याच्याकडेच बघत. -

नको सर. तुम्ही घ्या. मला भूक नाहीये.”

 

तेवढ्यात वेटर आला.

समरने दोन मसाला डोश्यांची ऑर्डर दिली.

 

शरयू मनातच चिडली —  (आता दोघं मसाला डोसा खाणार? खरंच काय चाललंय?)

 

समर म्हणाला —

इथला मसाला डोसा खूप छान आहे. खाऊन बघ.”

 

ती परत मनात —

(अरे देवा! खरंच यांना मनातलं ऐकू येतंय की काय?)

 

तो हळूच विचारतो —

तुला माझा राग आलाय का?”

 

शरयू थोडी दचकीत.

(अरे वा! आधी सगळ्यांसमोर ओरडायचं, मग विचारायचं — राग आलाय का?)

 

समरचा आवाज मऊ झाला —

मला माहीत आहे, तुझ्यावर सगळ्यांसमोर ओरडलो. म्हणून तुला राग आला असेल.

Sorry for that. पण मी तरी काय करणार?

तू चुकीची चाल वाजवत होतीस. त्यामुळे सगळे distract होत होते.

बरं, समजावून सांगितलं तरी तू लक्ष दिलं नाहीस. म्हणून ओरडलो.”

 

हे ऐकून शरयू स्तब्ध झाली.

(खरंच? समर सर sorry म्हणाले?)

 

तिला विश्वास बसत नव्हता.

ती वेगळ्याच दुनियेत हरवून गेली.

---

तेवढ्यात वेटर डोसा घेऊन आला.

समरने तिच्या डोळ्यांसमोर हात हालवला.

 

ओ ठाले पाटील, पृथ्वीवर या. हा डोसा आवाज देतोय तुम्हाला.”

 

ती चमकली.

गोंधळलेल्या चेहऱ्याने हसत गप्प बसली.

आणि मग नकळत गुपचूप डोसा खायला लागली. पण आतूनतिचं हृदय जोरात धडकत होतं.

तिला खूप भूक लागली होतीच.

आणि आज पहिल्यांदाच तिला जाणवलं —

समर तिच्या मनातलं वाचतोय.

 

त्याच्या डोळ्यांतही काहीतरी होतं, जे अजून शब्दात आलं नव्हतं.

पण दोघांनाही कळलं होतं —

प्रेमाचं पहिलं पाऊल पडलेलं आहे.

 

- @ सौ. रोहिणी माने


माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ४


No comments:

Post a Comment