रात्री उशिरा समर लॅपटॉपसमोर बसला होता. स्क्रीनवर काहीतरी गंभीरपणे पाहत होता.
तेवढ्यात दरवाजा उघडतो, आणि प्रताप आत डोकावत म्हणतो,
"दादा चल ना, आई बोलवतेय—जेवायला...!"
समर नजरेतून स्क्रीन न सोडता म्हणाला,
"अरे नको रे, मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या.
अजून दुपारचं जेवन पचलेलं नाही..."
प्रतापच्या ओठांवर एक खट्याळ स्मित उमटलं.
" अरे हो तुझं पोट तर भरलेलं असेल ना दुपारच्या मेजवानी
ने….!"
"थांब रे तु….!"
समर खुर्चीवरून उठतो आणि प्रतापच्या मागे पळतो. दोघे आता
खोलीभर इकडून तिकडे पळू लागतात—
शेवटी समर त्याला गाठतो आणि मागून धरतो.
"सांग ना आता—कोणाची मेजवानी?" - आणि पाठीत दोन
गुद्दे देतो.
प्रताप कळवळत पाठ चोळत म्हणाला,
“काय रे दादा! मारतोस का एवढं? लागलं ना! मी त्या काव्याला
दुपारी नादी लावलं नसतं ना, तर तुला ती मेजवानी मिळालीच नसती!”
समरच्या चेहऱ्यावर क्षणभर भाव चमकले — आश्चर्य आणि थोडं
लाजेचं मिश्रण.
“कसली मेजवानी रे? काय बडबड करतोयस? मी फक्त तिला आपली
फॅक्टरी दाखवत होतो, एवढंच!”
प्रताप हलकंसं हसला.
चेहऱ्यावर विचारमग्न भाव आणत हाताची घडी घालून समोर उभा
राहिला -
“असं का बरं मग…,ते वहिनींच्या लिपस्टिकचे डाग तुझ्या ओठांवर
कसे आले,…. हं?”
समर गोंधळून हसत म्हणाला, - “थांब रे! बघतोच तुला आता…”
आणि बोलता बोलता तो प्रतापच्या मागे धावला.
क्षणात दोघे पलंगाभोवती फेऱ्या मारू लागले—प्रताप इकडून
तिकडे पळतोय, समर मागून झेप घेतो आणि अखेर त्याला पकडतो!
“आता सांग कसली मेजवानी ?”
समर हसतच म्हणतो आणि प्रतापचे दोन्ही हात मागे वळवून घट्ट
धरून ठेवतो.
प्रताप नाटकी आवाजात कळवळतो,
“दादा सोड ना रे! लागतंय! प्लीज दादा… मी परत नाही चिडवणार…”
समरच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटलं,
“सोडतो… पण आधी तुला माझं एक काम करावं लागेल.”
प्रतापचा चेहरा संशयाने वाकडा झाला, - “काम? कसलं काम?
आधी सांग तर!”
“नाही,” समर म्हणाला, - “आधी करशील असं प्रॉमिस कर, मग
सांगतो.”
प्रतापने एक दीर्घ श्वास घेतला, - “बरं बरं, करतो! आता
तरी सोड ना बाबा!”
समरने अखेर त्याला सोडलं.
प्रताप कसंबसं सावरत उभा राहिला, शर्ट सरळ करत म्हणाला,
“दादा, तू ना... अगदी सिरीयलमधल्या खलनायकासारखा वागतोस!”
समर हसत खुर्चीवर बसला,
“अरे खलनायक नाही रे… दादा आहे तुझा! फरक ठेव थोडा!”
प्रतापने ओठ वाकडे करत म्हटलं,
“बरं बरं, सांग आता कसलं काम आहे तुझं, पण पुन्हा पकडलंस
ना तर थेट आईकडे कंप्लेंट करतो!”
समर खुर्चीवर मागे रेलून हसत म्हणाला,
“काम काही मोठं नाही रे… आणि काम माझं नाही, तुझंच आहे.”
प्रतापने डोकं खाजवलं, - “माझं? म्हणजे काय रे दादा?”
समर हसतच पुढे म्हणाला,
“काही नाही, ती शरयू… तिला तू वहिनी वहिनी करत फिरतोस ना…
ते खरंच की असंच टाइमपास?”
प्रतापचा चेहरा क्षणात लाल झाला.
“ए दादा, काहीही काय बोलतोस तू! मी खरंच मनापासून वहिनी
म्हणून एक्सेप्ट केलंय तिला.
तुला खोटं वाटत असेल तर तू फक्त ‘हो’ म्हण, मी आत्ताच जाऊन
आईला बोलतो.”
समरने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं — त्या खोडकर चेहऱ्यावर
आता एक गंभीरपणा होता.
“हो,” तो ठामपणे म्हणाला.
प्रताप थबकला, - “अं? म्हणजे… ’?”
समर मिश्कील हसत म्हणाला,
“अरे तूच तर म्हणालास ना — ‘तु फक्त हो म्हण, मी आईला बोलतो,
जा मग, बोल!”
प्रताप गप्प. त्याच्या चेहऱ्यावर आता गोंधळ आणि थोडं टेन्शन.
“दादा… म्हणजे खरंच सांगू का आईला?”
समर उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो,
“हो रे. सांग. पण नीट सांग हं… असं मस्करीत नाही. तुला
माहीत आहे ना, आई फक्त माझं नाही, तुझंही ऐकते आणि शरयूला… तुझी वहिनी म्हणून तू ज्या
नजरेनं बघतोस ना,
ती नजर पाहून कोणतीही आई लगेच समजून जाईल की हे नातं खोटं
नाही.”
प्रताप काही क्षण शांत राहिला.
त्याच्या डोळ्यात हलकी भीती होती, पण मनात कुठेतरी समाधानही.
“तू ना दादा…” तो हसत म्हणाला,
“एकदम बाप आहेस प्लॅनिंगचा.”
समरही हसला.
“बाप नाही रे… भाऊ आहे तुझा. आणि हे काम तुझ्याशिवाय दुसरा
कोणीच करू शकत नाही.”
प्रतापने हलकंसं मान डोलावली.
“ठीक आहे, उद्या सकाळी बोलतो आईशी… पण तू मागे उभा राहशील
हं?”
दोघेही पुन्हा हसले,
पण हसण्यामागे या वेळी काहीतरी वेगळं होतं — थोडं धैर्य,
थोडं प्रेम, आणि भरपूर आपुलकी.
---
सामर परत
लॅपटॉपसमोर बसला होता. स्क्रीनवर कोडच्या ओळी नाचत होत्या, पण मन मात्र थोडं
अजूनही प्रतापवर अडकलेलं.
दारापाशी
थांबलेला प्रताप थोडा वळला,
“दादा, एक सांगू का?”
समर न
उठता म्हणाला, “हम्म, सांग ना…”
प्रताप
थोडं हसत म्हणाला,
“मी जे दुपारच्या मेजवानी बद्दल बोलत होतो ना… ती आपली जेवणाची मेजवानी होती!
तू काहीतरी
वेगळंच समजलास रे!”
समरचे
बोटं कीबोर्डवर थांबली. त्याने भुवया वर केल्या. प्रतापच्या चेहऱ्यावर लबाड हसू.
प्रताप
खट्याळपणे डोळा मारत म्हणाला,
“आणि ते लिपस्टिकचा तर मी असंच तुक्का मारला … पण वाटतंय नेम बरोबर बसला!”
क्षणभर समर
अवाक् झाला… आणि मग नकळत गालातच हसला. तो हसू लपवायचा प्रयत्न करत होता, पण
ओठांच्या कोपऱ्यातून ते गोड उघड झालं.
प्रतापला
ते दिसलं, तोही हसत दारातून बाहेर निघाला,
“शुभ रात्री, दादा… आणि जरा कमी काम कर — नाहीतर स्वप्नातही लॅपटॉप उघडशील.”
दरवाजा बंद झाला, आणि खोलीत शांतता पसरली.
समर
स्क्रीनकडे बघत होता, पण आता स्क्रीनवर कोड नव्हता — त्याच्या मनात मात्र शरयूचं हसणं
उमटलं होतं… आणि त्या विचाराने ओठांवर पुन्हा एक मिश्कील हसू आलं. 😌
त्याने हळूच मॅसेज टाईप केलं —
समर: Hii
शरयू: Hii
समर: झोपली नाहीस अजून?
शरयू: तुम्ही तरी कुठे झोपलात?
समर हसला —
समर: माझं तर तहान, भूक, झोप… सगळंच हरवून गेलंय.
शरयू: आणि ते कसं काय बरं?
समर: आता काय सांगू तुला…?
शरयू: त्यावर काही उपाय ?
समर: हम्म… आहे एक उपाय.
तुझ्या प्रताप भाऊजीला लावलंय कामाला… बघू आता काय करतो
ते.
शरयू (गोंधळून): म्हणजे?
समर (मिश्कील टोनमध्ये): अहो राणी सरकार, आता आपल्या बद्दल
घरी सांगायला नको का ?
ती लाजली, काही क्षण शांत राहिली. मग घाबरतं —
शरयू: अहो पण माझ्या घरी मी कसं सांगू? बाबा रागवतील ना…
समर: तु नको काळजी करू. आम्ही माझ्या आई-बाबांशी आधी बोलतो.
ते तयार झाले की, तुझ्या घरी येऊन रितसर मागणी घालतो. मग
तर झालं ना!
शरयू (हळूच घाबरतं ): तयार झाले… म्हणजे?
समर तिची फिरकी घेत म्हणाला,
समर: हम्म…नाही पण म्हणू शकता.. 😏
शरयूचा श्वास अडकला.
शरयू: नाही ओ, असं नका म्हणू… मी नाही जगू शकत तुमच्या
शिवाय…
हे वाचताच समरचं हृदय थोडं हललं.
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मऊ झालं.
समर: अगं हो हो… गम्मत करत होतो मी! एवढी काय घाबरतेस,
मी आहे ना, कुठे जाणारे तुझ्याशिवाय… ❤️
थोडं थांबून त्याने शेवटचा एक मेसेज पाठवला —
समर: Love You ❤️.
शरयू
(हृदय
धडधडतं, चेहरा गरम होतो, डोळ्यांत ओलावा तर ओठांवर हसू) : Love you too…
समरच्या ओठांवर आपोआप हसू उमटलं — ते हसू जणू प्रेमातल्या
खात्रीचं होतं…
- @ सौ. रोहिणी माने
No comments:
Post a Comment