बोलता बोलता ते दोघं समरच्या केबिनजवळ आले. दारावरची पाटी शरयूच्या नजरेत भरली –
“श्री. समर धैर्यशील शिर्के पाटील”
गंभीर, ठळक अक्षरात लिहिलेलं ते नाव तिला जणू काही वेगळंच भासत होतं. तिच्या हातात अजूनही समरचा हात होता. त्याच्या केबिन शेजारीच प्रताप ची आणि त्याच्या बाबांची केबिन होती.
ते दार उघडून आत गेले तसं दार आपोआप लॉक झालं. समरने हळूच शरयूला वळवून गोल फिरवतं , बाजूच्या भिंतीवर टेकवलं . दोघे खूप जवळ होते, त्यांच्या श्वासांची लय एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळत होती, आणि त्या जवळीकने दोघांचं हृदय धडधडायला लागलं होतं.
समरने तिच्या डोळ्यात बघत विचारलं, - “काय गरज होती एवढं नटायची? जीव घ्यायचाय का माझा?”
शरयूने हळूच त्याच्या तोंडावर हात ठेवला, डोळे खाली घालून, आवाजात लाज मिसळून म्हणाली, -
“तुमच्यासाठीच तर…”
तो थोडा हसला, तिच्या ओठांकडे बघत, - “गुन्हा तर केलाय तू… आता त्याची शिक्षा तर मिळणारच.”
त्याच्या हेतू शरयूच्या लक्षात आला तसं तिच्या चेहऱ्यावर लाली चढली. त्याचा एक हात तिच्या हातात होता, तर दुसरा हात भिंतीवर टेकवून त्यानं तिला लॉक केलं होतं .
समरने हळूच आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले, आणि एक passionate kiss सुरु झाला.
तीही त्याला मोकळेपणाने प्रतिसाद देत होती , हात अजूनही त्याच्या हातात गुंतले होते, तिचा श्वास अडकायला लागला तसे ते थांबले. तो हि तिच्या बाजूला भिंतीवर विसावला. खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता.
क्षणभर दोघे एकमेकात हरवले होते, शब्द नसताना ही जाणीव इतकी घनिष्ठ आणि रोमँटिक होती की त्यांच्यासाठी सगळं जग थांबून गेले असे वाटत होते.
समरने पायाने हळूच त्याची खुर्ची ओढली आणि त्या खुर्चीवर बसला. त्या खुर्चीत तो अजून रुबाबदार दिसत होता—डोळ्यांत थोडासा ठामपणा, ओठांवर हलक खोडकर हसू. क्षणभर शरयू त्याला बघतच राहिली.
तिची तंद्री लागलेली बघून त्यानं तिच्या हाताला झटका दिला तशी ती त्याच्या मांडीवर आली.
त्याने हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि डोळ्यांतून हसत विचारलं,
“काय बघताय ठाले पाटील… काही होतंय का तुम्हाला?”
शरयू परत लाजलीआणि तिनं तिच्या दोन्ही हातानी तिचा चेहरा झाकून घेतला, त्याने तिच्या हातांना हळूच बाजूला करून हसत म्हटलं,
“म्हणजे हे बरं आहे तुमचं… तुम्ही आमच्याकडे बघायचं आणि आम्ही बघू, तर लगेच तोंड झाकून घ्यायचं?
शरयूचा चेहरा अजून लालसर झाला. तिच्या डोळ्यांत भीती नव्हती, फक्त लाज, उत्सुकता आणि थोडासा मोह मिसळलेला होता. समरच्या हातांचा स्पर्श आणि डोळ्यांतला हा खेळ, त्यांना अजून जवळ आणत होता—जणू वेळ थांबून गेलेली होती आणि खोलीत फक्त त्यांचा हळुवार संवाद आणि नजरेतलं खेळणं शिल्लक राहिलं होतं.
तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला. स्क्रीनवर प्रताप नाव दिसताच शरयू पटकन बाजूला सरकली. समरने फोन उचलला.
प्रताप: “हॅलो दादा…”
समर: “हा, बोल…”
प्रताप: “अरे कुठे आहात तुम्ही? तुला आणि वहिनीला सगळे शोधतायेत… ती काव्या तर खूपच डोकं खातेय, तिला सांभाळणं अवघड आहे आता, आणि जेवण पण थंड होतंय, तुम्ही लवकर या…”
समर: “बरं बरं, आलोच आम्ही…”
प्रताप: “आणि हो, आधी वहिनीला पाठव, मग तू ये थोड्या वेळानं, नाहीतर उगाच…”
समर: “हो रे, समजलं… आलोच आम्ही.”
समरने फोन ठेवला. शरयूने ताबडतोब विचारलं,
“काय म्हणत होते प्रताप भाऊजी?”
समर थोडा आश्चर्यचकित झाला, “प्रताप भाऊजी…?”
तशी ती परत लाजली. तो खुर्चीवरून उठून तिच्या जवळ आला, ती खाली मान घालून पदारासोबत खेळत होती. तिच्या दंडाला हलकासा हात लावून तिला मिठीत घेतलं.
“ओ ठाले पाटील, तो तुम्हाला ‘वाहिनी’ म्हणतोय, तुम्ही त्याला ‘भाऊजी’ म्हणताय… बरं, चाललंय की तुमचं? अन आमचं काय?”
शरयूने हसत विचारलं, “तुमचं काय आता?”
समरने हसून म्हटलं, “मला कंटाळा आलाय आता…”
“अन तो कशाचा?” तीनं गडबडून विचारलं .
“तुला ठाले पाटील म्हणायचा…”
त्याचवेळी त्याचा फोन परत वाजला. शरयूने त्या क्षणाचा फायदा घेत त्याला हलकासा धक्का दिला, आणि त्याच्या मिठीतून सुटून दाराकडे जाऊ लागली.
समरने मागून तिचा हात धरला, हलकं हसत म्हणाला,
“तुम जो चले गये तो, होगी बडी खराबी… तुम्हे दिल में बंद करलू, दर्या में फेक दु चावी…”
शरयू हसत आणि लाजत परत त्याच्या मिठीत आली.
एकमेकांच्या मिठीत, त्या क्षणात, दोघं वेगळ्या जगात हरवलेले होते—जिथे फक्त त्यांचा संसार, त्यांची हसणं, आणि मिठीतला आराम होता.
समरने तिला मिठीतून हळू बाजूला केलं, तिच्या कपाळावर ओठ ठेऊन म्हणाला,
“तू एक काम कर, तू पुढे जा… मी येतोच मागून. सोबत गेलो तर उगाच चर्चेला विषय होईल. केबिनच्या बाहेर गेलीस तर डाव्या बाजूला वळ आणि तिथल्या दरवाज्यातून बाहेर जा.”
शरयू थोडी हसत म्हणाली,
“ठीक आहे, जाते मी… या तुम्ही…”
समरने हसून तिच्याकडे पाहत म्हटलं,
“जाते नाही, येते म्हणावं शरू…”
त्याचं तिला ‘शरू’ म्हणणं तिच्या हृदयाला हलकेसे स्पर्शून गेलं. तीनं थोड लाजत हसून उत्तर दिलं ,
“बरं, येते.”
शरयू बाहेर आली तसं काव्याने तिला विचारलं,
“अगं कुठे होतीस इतका वेळ? केव्हाची शोधतेय मी तुला… अन फोन का लागत नाहीये तुझा?”
शरयूने हसत सांगितलं,
“अगं वॉशरूम शोधत होते, ते शोधता शोधता मीच हरवले. बाहेर यायचा रस्ताच सापडेनासारखा वाटला. आले बाई कशी तरी शोधत शोधत, आणि फोनला रेंज नाहीये बहुतेक इथे. मी पण तुला फोन लावत होते.”
तेवढ्यात प्रतापने जेवायला आवाज दिला. दोघींनी ताटं वाढून घेतली आणि जेवायला बसल्या. समर आणि प्रताप सगळ्यांची विचारपूस करत होते, जेवणाचा आग्रह धरत होते.
पुरणपोळीचा टोप समोर ठेवत प्रताप मिश्कीलपणे काव्याला म्हणाला ,
-
“घे, खूप भूक लागली होती ना तुला? अजून देऊ का?”
जेवण करून दोघी घरी परतल्या.
त्या दिवसाचा थोडासा गोंधळ, लाज, आणि हसणं—सगळं एकत्र मिसळून त्यांना एक अनोखी, हलकीशी रोमँटिक आठवण ठरली होती. आजचा दिवस त्यांच्यासाठी खरंच खास आणि अविस्मरणीय ठरला होता.
- @ सौ. रोहिणी माने
No comments:
Post a Comment