समर गॅलरीत उभा राहून, मोबाईल हातात घेत स्वतःशीच विचार करतो – “मेसेज करू का…? नको…? पण बोलल्याशिवाय मन शांत होतच नाही.”
थोडा वेळ इकडे-तिकडे फिरून तो शेवटी मेसेज टाईप करतो.
समर – Hii…
शरयू – (झटक्यात reply करते) Hiii
समर – कशी आहेस ?
शरयू – छान… आणि तुम्ही ?
समर हसत हसत टाईप करतो –
समर – “हम तेरी मोहब्बत में यूं पागल रहते हैं, दीवाने भी अब हमको दीवाना कहते हैं…”
शरयू – (हे वाचून हसते, पोटात गुदगुल्या झाल्यासारखं होतं)
हा बस बस, लगेच सुरू करू नका, ते जाऊ द्या…
समर – अगं जाऊ पण देतो तुला… पण आधी आपलं लग्न झालं तर, प्रतापच होईल ना .... मग मिळेल तुला जाऊ ....!
शरयू – (गालातल्या गालात हसते आणि लाजतेही) काय काय सुचतं तुम्हाला देव जाणे…
समर – सुचतं कारण मन सतत तुझ्यातच हरवतं गं…
क्षणभर दोघं शांत राहतात. शांततेतही एक उबदार भाव असतो.
शरयू – जेवलात का ?
समर – हो… आणि तू ?
शरयू – मी पण.
सामर – Good. जेवणावरून आठवलं – उद्या सगळ्यांसाठी आपल्या फॅक्टरीत मेजवानी ठेवलीये. नक्की ये, मी वाट बघतोय.
शरयू – (मनापासून हसत) हो… नक्की.
समर – Good Night &
Sweet Dreams
शरयू – Good Night &
Sweet Dreams
समर – (थोडा थांबून हळुवार पाठवतो) Love You ❤️
शरयू – (हृदय धडधडतं, चेहरा गरम होतो, डोळ्यांत ओलावा तर ओठांवर हसू) Love you too…
---
आता तिला एकाच विचाराने घेरलं होतं – “उद्याच्या मेजवानीला गेले नाही तर समरला किती वाईट वाटेल… पण आईला कसं पटवायचं?”
ती धीर करून आईजवळ जाते.
शरयू – आई… उद्या आमच्या मंडळानं मेजवानी ठेवलीये. मी जाऊ का? सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत…
आई तिच्याकडे थोड रागानं पाहते.
आई – आता कशाला जायचंय ? झालं ना आता पुरे, आणि मेजवानीचं काय एवढं मोठं? नकोस जाऊ.
शरयूला डोळ्यात पाणी येतं. पण ती हार मानत नाही.
शरयू – (गंभीर आवाजात) आई… प्लीज ना… एवढ्या वेळेस , हे खरंच शेवटचं आहे. नाही गेले तर मनात कायम हुरहूर राहील…
आई काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे बघत राहते. त्या डोळ्यांतल्या प्रामाणिकपणासमोर तिला ‘नाही’ म्हणवत नाही.
आई – बरं, पण – उशीर करू नकोस. लवकर घरी ये. बाबांना काही वाटलं तर मला कठीण जाईल…
शरयू – (डोळ्यात पाणी चमकवत) हो आई… मी लवकर येईन.
आईच्या परवानगीने शरयूच्या मनावरचं ओझं हलकं होतं, आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समरची आठवण
येऊन गोडसं हसू उमलतं.
गणपती विसर्जन होऊन चार दिवस झाले होते. गाव अजूनही त्या उत्सवाच्या आठवणीत रममाण होतं. ढोल–ताशांचा नाद थांबला होता, पण घराघरांतून अजूनही तो उत्सवाचा गंध हवेत दरवळत होता.
आज समर च्या फॅक्टरी मध्ये त्यानं खास मेजवानी ठेवली होती—गणपतीच्या यशस्वी सोहळ्यात ज्यांनी खपून मेहनत घेतली त्यांचं कौतुक म्हणून. फॅक्टरीच्या अंगणातल्या रांगोळ्या, फुलांच्या माळा, उजळलेला प्रकाश आणि सगळीकडून येणारा खमंग सुवास—भाजीचा, गरमागरम पुरीचा, पुरणपोळीचा, मसालेदार पातळ आमटीचा—सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत होतं.
हशा, गप्पा, टाळ्यांचा गजर असा उत्साह सर्वत्र पसरलेला होता. प्रत्येकाच्या तोंडून कौतुकाची वाक्ये निघत होती—
"या वेळचा सोहळा खरंच भारी झाला रे!"
"सगळं अगदी सुरळीत पार पडलं!"
सगळ्यांच्या बोलण्यात एकच होतं —समर आणि प्रतापचं नियोजन.
समर स्वतः सगळीकडे लक्ष देत होता. कुठे प्लेट कमी पडू नये, पाण्याची सोय नीट आहे का, पाहुण्यांचं आदरातिथ्य नीट चाललंय का, हे तो तपासत होता. बाहेरून तो सगळं व्यवस्थित सांभाळत होता, पण मन मात्र सतत गेटकडे धाव घेत होतं—शरयू अजून आली नव्हती.
तो प्लेट्स मांडत होता, कुणाशी बोलत होता, पण नकळत डोळे दर दोन मिनिटांनी गेटकडे वळत होते. मनात हळूच एक हुरहूर—“ती आली का नाही अजून?”
तेवढ्यात प्रताप समरच्या खांद्यावर हलकेच हात ठेवतो आणि हसत -
"काय झालं दादा ?"—प्रतापच्या नजरेत खट्याळपणा होता.
समर लगेच आपलं लक्ष दुसरीकडे वळवतो - "काही नाही रे… फक्त बघत होतो सगळं नीट चाललंय का."
प्रताप त्याला डोळ्यांनी खुणावतो त्याचं लक्ष एकदम गेटकडे जातं.
गेटमधून त्या दोघी आत शिरत होत्या.
डोळ्यात ओलसर गोडवा आणि चेहऱ्यावर हलकस हसू… शरयू.
प्रांगणात हलकीशी गोंगाटाची झुळूक होती. सावलीतून आत येताना शरायूचं रूप एकदम वेगळंच भासत होतं. लिंबू रंगाच्या शिफॉन साडीतली ती खूपच नाजूक दिसत होती. मोकळे सोडलेले केस वाऱ्याने हलकेच तिच्या गालांवर येत होते, हातावर रुळणारा पदर ... ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक, डोळ्यांत एक निरागस चमक.
काव्या तिच्या शेजारी होती, पण समरची नजर फक्त तिच्या वरचं खिळली होती. क्षणभर तो भारावून गेला.
“तुला पाहीले अन सांज मंद झाली..,
ओशाळल्या चांदण्या अन् हवा कुंद झाली…., शुद्धीत होते आताच सारे…., तु पाहीले अन् वेळ धुंद झाली.......”
त्याच्या मनात शब्द उमटले. आजूबाजूचं सगळं धूसर झालं आणि फक्त तीच त्याच्या डोळ्यांसमोर होती .....
ती जवळ आली तस प्रतापनी त्याला हलवून भानावर आणलं.
जवळ आल्या, तस त्यांनी समर आणि प्रताप ला हसून ग्रीट केलं - हॅलो....
प्रताप - अगं किती उशीर लवकर यायचं ना, (समर कडे बघत, हसत ) केव्हाची वाट बघतोय आम्ही....
काव्या - अहो प्रताप भैय्या मी तर केव्हाची आले असते, ह्या शरयू मुळे लेट झालं, काय गरज होती एवढं साडी घालायची....
प्रताप - (तिला हाताला धरून आत घेऊन जात ) अगं जाऊ दे गं, आवडतं असेल तिला, त्यात काय एवढं...
बोलता बोलता प्रताप तिला आत घेऊन गेला होता.
आता समर आणि शरयू दोघेच शांत उभे होते. बाहेरची गर्दी, आवाज, हशा… सगळं काही क्षणभर विसरल्यासारखं वाटत होतं. शरयूचा चेहरा थोडासा लाजरा झाला होता. ती खाली बघत, अंगठ्याने जमीन कोरत होती, पण तिच्या गालांवरचा गुलाबीपणा समरच्या नजरेतून सुटला नाही.
त्याला वाटलं, - ही एवढी साधीशी हालचालही किती मोहक असते!
तो थोडा पुढे सरकला. शरयूला जाणवलं, पण ती अजूनही नजरेला नजर देत नव्हती. समर हळूच म्हणाला ,
“छान दिसतेय ..... ”
शरयूने हसून हलकिशी मान खाली घालून डोळे मिटले. त्या क्षणी तिच्या श्वासांचा मंद स्पर्श समरपर्यंत पोहोचला.
क्षणभर त्याने हात पुढे करावा की नाही असा विचार केला. पण मग हळूच, फार जपून, तिच्या जवळ उभा राहिला. त्यांच्या खांद्यांचा हलका स्पर्श झाला, आणि त्या छोट्याशा स्पर्शाने दोघांच्याही अंगावर रोमांच उठले.
शरयूने डोळे उघडून क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. नजर भिडली… आणि त्या नजरेत इतकं काही दडलेलं होतं की शब्दांची गरजच उरली नाही.
समरच्या ओठांवर नकळत हसू आलं -
“शरयू… असं उभं राहून जर आयुष्यभर तुला बघत राहिलो, तरी पुरेसं होईल असं वाटतंय.”
शरयूच्या ओठांवरही गोड हसू फुललं. तिच्या डोळ्यांमध्ये चमक होती, आणि त्या चमकेत समरला आपलं संपूर्ण जग दिसलं.
समरने हलकंसं हात पुढे केला, डोळ्यांमध्ये खोडकर हसू होतं –
“चल… तुला फॅक्टरी दाखवतो.”
शरयू थोडा वेळ थांबली. तिच्या डोळ्यांत लाजरा संकोच होता, पण नकळत तिचा हात त्याच्या हातात सरकला. ती स्पर्शाची ऊब… क्षणभर दोघांच्याही मनात एकाचवेळी वीज चमकून गेल्यासारखं झालं.
समरचा हात मजबूत, ठाम… तर शरयूचा हात कोमल, थरथरणारा. त्या छोट्याशा स्पर्शाने दोघांची पावलं आपोआप जुळली.
दोघं चालत होते, पण त्यांच्या मनात मात्र पाऊलोपाऊल काहीतरी वेगळं उमलत होतं.
समर तिला फॅक्टरी दाखवत होता—कधी मशिनरी, कधी हॉल, पण त्याची नजर मात्र वारंवार शरयूकडेच वळत होती. ती प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहत होती, आणि समरला तिच्या त्या भावनांची, चमकणाऱ्या डोळ्यांची मोहिनी पडत होती.
एका मशीनजवळ ती थांबली. आवाज थोडा जास्त असल्याने शरयूने त्याच्याकडे वळून विचारलं,
“हे काय करतं?”
आवाजावर मात करण्यासाठी समर तिच्या खूप जवळ आला. त्याचे शब्द तिच्या कानाजवळ कुजबुजल्यासारखे आले. त्या अंतराने शरयूच्या अंगावर शहारा उठला. तिच्या केसांची लट हलकीशी त्याच्या गालाला स्पर्शून गेली…
दोघेच क्षणभर स्तब्ध झाले.
हात अजूनही एकमेकांत गुंतलेले होते. त्या स्पर्शात इतकं काही होतं की बाकीचं सगळं गौण भासत होतं.
समरने हलक्या आवाजात विचारलं,
“शरयू… तुला खरंच फॅक्टरी दाखवतोय, की कारण काही वेगळंच आहे असं वाटतंय तुला?”
शरयूचा चेहरा गुलाबी झाला. ती काही बोलली नाही, फक्त हळूच नजर वळवली… पण तिच्या डोळ्यांतलं उत्तर मात्र समरला स्पष्ट दिसलं.
- @ सौ. रोहिणी माने
माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ७
No comments:
Post a Comment