समर आरशासमोर उभा राहून शर्ट घालून पाहत होता, कॉलर सरळ करताना त्याने आरशात स्वतःकडे पाहून कपड्यांचा अंदाज घेतला.
आरशातूनच त्याने मागे पाहिलं — प्रताप सोफ्यावर पाय ताणून मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता.
प्रताप (वर न बघता):
“दादा , लग्न ठरल्यापासून आरशातच जास्त वेळ घालवतोयस. काही खास आहे का उद्या?”
समर (हलकं हसत):
“काही नाही रे, उद्या गगन बावड्याला मिटिंग आहे. म्हणून कपडे चेक करतोय.”
प्रताप:
“एकटाच चाललाय का ?” 😏
समरने त्याच्याकडे रागाने पण हलक्या स्मिताने कटाक्ष टाकला.
समर:
“तुला काहीच काम नाही का? रोज चौकशी मोड चालू असतो तुझा.”
प्रताप (गालात हसत):
“दादा, विचारतोय फक्त, मी तुझा पीए नाही पण ‘सीक्रेट एजंट’ नक्की आहे.”
समरने फाईल्स गोळा करत उत्तर दिलं —
“सकाळी लवकर जाईल, मिटिंग एक-दोन तासांची आहे, संध्याकाळी परत येईन बहुतेक.”
प्रतापच्या चेहऱ्यावर हलकं गूढ हसू आलं.
समर:
“बरं ऐक… उद्या मी नसणार, मेहताला भेट सांगली प्रॉपर्टीबद्दल, स्टाफचं पेमेंट पण करून टाक. बाबांकडून चेक घे. आणि हो, रुपेशला मी सगळं सांगितलंय.”
प्रताप काहीतरी विचारात गेला, त्याच्या चेहऱ्यावर थोडं ‘मलातरी काही सुचलंय’ असं भाव.
समर (थोडं चिडून):
“काय झालं? पुन्हा काही स्कीम डोक्यात आली का?”
प्रताप (खोडकरपणे):
“ते सगळं मी करतोच, पण एक आयडिया आहे…”
समर:
“बाबा रे! रात्रीच्या या वेळेला तू काही ‘आयडिया’ सांगितलीस की माझी झोप उडते.”
प्रताप:
“अरे ऐक ना, वहिनीला सोबत घेऊन जा उद्या!”
समर थबकला. चेहऱ्यावर अचानक हसू आणि गोंधळाचं मिश्रण.
त्याच्या डोळ्यांत हलकी चमक आली — जणू मनातल्या मनात त्याला कल्पना आवडली होती.
समर (थोडा अडखळत):
“अरे पण... बरं नाही ना वाटणार असं? तिच्या घरच्यांना काय सांगनार ?”
प्रताप (हात हलवत):
“अरे काय सांगायचंय त्यांना? तू कॉलेजमधून तिला पिक कर, मिटिंग संपल्यावर संध्याकाळपर्यंत परत ये. एवढंच.”
समर:
“जमेल का ?…”
प्रताप (हसत उठतो):
“अरे दादा, ‘समर धैर्यशील शिर्के पाटील’ ला जमणार नाही अशी गोष्ट जगात नाही! … थोडा वेळ सोबत मिळेल दोघांनाही.”
समरने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले —
“ते बघतो मी पण , आईला सांगशील तर तुला मी ताडोबाच्या जंगलात पाठवीन मिटिंगसाठी.” 😄
प्रताप हसत म्हणाला —
“काळजी नको, मी काही सांगत नाही… बिनधास्त जा रे.”
दोघेही हसले.
समर हसत हसत आपल्या रुममध्ये गेला, पण चेहऱ्यावर अजूनही तीच चमक होती —
प्रतापच्या सुचनेने त्याच्या मनात शरयूची आठवण पुन्हा उजळली होती. 💞
-----
प्रताप निघून गेला तसा समर ने मोबाईल हातात घेत शरयू ला मॅसेज केला
समर - Hiii
शरयू - Hiii
समर - काय करताय राणी सरकार ?
शरयू लाजत - काही नाही असंच तुमची आठवण काढत होते.
समर - उद्याच काय प्लॅनींग आहे ?
शरयू - काही विशेष नाही... कॉलेज आणि घर.
समर - फिरायला जाऊ या ?
शरयू आश्चर्याने - काय ?
समर - अगं माझी उद्या गगन बावड्याला मिटिंग आहे, मी एकटा जात होतो तर प्रताप म्हणे एकटा कशाला जातो, वहिनीला घेऊन जा..., जमेल का तुला ?
शरयू - जमेल पण... , मग घरी काय सांगू ?
समर - घरी कशाला काय सांगते.. मी तुला कॉलेज जवळून पिक करतो तुझं कॉलेज सुटण्या च्या वेळे पर्यंत आपण परत येऊ....
शरयू - आणि चुकून हुकून घरी माहित झालं तर ...?
समर - मग सांगेल थेट — हो, गेला होतो माझ्या होणाऱ्या बायकोसोबत! 😏
आपलं लग्न ठरलेलं असताना घाबरायचं काय आता? ❤️शरयू - ठीक आहे ... भेटू मग सकाळी कॉलेज जवळ.
समर - हो ७ वाजे पर्यंत येतो मी स्टॉप ला
शरयू लाजत - Love You... 💞
समर - Love You too ... 💞
स्क्रीन मंद होते, पण दोघांच्या चेहऱ्यावर एकच तेज —
“उद्या पहिल्यांदा मनासारखी भेट…” ❤️
----
सकाळी समर बरोबर ७ वाजता स्टॉप वर पोहोचला, ती आधीच स्टॉप वर येऊन थांबली होती, लाईट पिंक कलरचा ड्रेस, त्यावर गोल्डन कलरची ओढणी, क्लचर लावून मोकळे सोडलेले केस, कानामागे लावताना होणारी मोहक हालचाल, समर बघतच राहिला. भानावर येत त्यानं तिला आवाज दिला, - शरू....
ती गाडी जवळ आली तसा त्याने गाडीचा दरवाजा आतून उघडला.
ती गाडीत बसली, त्यानं गाडी सुरु केली, तसा सीटबेल्ट चा आवाज सुरु झाला, तिला मागचे क्षण आठवले, पण ह्या वेळेस तिने सीट बेल्ट लावायचा प्रयत्न केला नाही.
तो हसला तिचा विचार त्याच्या लक्षात आला तसा तो पुढे झाला आणि सीट बेल्ट लावू लागला, तिचे श्वास त्याला चेहऱ्यावर जाणवतं होते, त्याच्या स्पर्शाने तीही शहारली, सीट बेल्ट लावून तो बाजूला होत बोलला - सीट बेल्ट लावायला शिकून घ्या मॅडम आता..
शरयू - का दोन वेळेस च लावला तर थकले, मला वाटलं होत आपल्याला आयुष्यभर सीट बेल्ट लावायची गरज पडणार नाही... पाटील समर्थ आहेत.
दोघंही हसले .. गाडी सुरु झाली... गाडीत त्याच्या आवडीचं गाणं वाजतं होतं - बडी मुश्किल है, खोया मेरा दिलं है, कोई उसे ढुंढ के लाये ना, जाके कहा में रपट लिखाऊ, कोई बतलाए ना... मै रोऊ या हंसू करू में क्या करू....
----
टपरीच्या बाजूला छोटंसं बाकडं, मागून येणारा गार वारा, आणि चहाच्या वाफेत मिसळलेला मातीचा गंध…
दोघं तिथं बसले, समर ने चहाची ऑर्डर दिली. टपरीवाल्याने दोन छोट्या ग्लासात उकळता गरम चहा आणून दिला.
समरने ग्लास हातात घेतला, एक घोट घेत म्हणाला —
“वा, भारी चहा आहे! असं वाटतं या घाटावरच पाणीच वेगळं आहे.”
शरयू हलकी हसली —
“चहाचं काय आहे, जो कुणी बनवतो त्याच्या मनासारखा असतो… तू बनवशील तर नक्की जास्त गोड असेल.”
त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.
त्याने चहाचा ग्लास बाकड्यावर ठेवला, आणि थोडं बाजूला होऊन फोनवर बोलू लागला.
शरयू त्याच्याकडे बघत होती — फोनवर बोलताना त्याच्या डोळ्यातील गंभीरपणा आणि चेहऱ्यावरच्या नजरेतील आकर्षण तिचं लक्ष वेधून घेत होतं.
तिने आपला ग्लास संपवला आणि मग खट्याळपणे त्याचा ग्लास हातात घेतला — अजून थोडा गरम होता.
तिने हलकासा एक घोट घेतला… आणि मग पुन्हा एक.
तोच चहा, पण त्याच्या ओठांच्या स्पर्शानं जणू काही वेगळंच जाणवलं तिला. तिच्या गालावर गोड हसू उमटलं.
समर फोन ठेवून वळला —
ग्लास रिकामा बघून थोडा गोंधळला.
“अरे, माझा चहा कुठं गेला?”
शरयू त्याच्याकडे बघत हसली —
“मी पिला… तुझ्या चहात गोडी थोडी जास्त होती.” 😉
तो एक क्षण स्तब्ध झाला, मग हलकं हसत जवळ येत म्हणाला —
“अगं, माझ्या चहात गोडी नाही… ती तर तुझ्या ओठांवर आहे.” 💞
ती लाल झाली, हलकंसं त्याच्याकडे पाहून म्हणाली —
“बस्स्स… एवढं बोललंस की आता दुसरा चहा प्यायलाच नको.”
दोघं हसले, हवेत गोडीचं वातावरण पसरलं.
टपरीवाल्याने पैसे घ्यायला येताच समरने नोट दिली, फोन पुन्हा वाजला —
“अरे यार, हा क्लायंटसुद्धा वेळ बघत नाही.”
तो फोनवर बोलू लागला, आणि शरयू हळूच त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली — तिच्या खांद्यावर तिचे केस थोडेसे उडाले, त्याचा हात नकळत तिच्या पाठीवर हलकासा टेकला…
दोघं एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करत गाडीकडे वळले.
त्या क्षणी ना चहा आठवत होता, ना क्लायंट —
फक्त एकमेकांची जवळीक आणि चहासारखंच थोडं गरम, थोडं गोड प्रेम हवेत विरघळलं होतं. ☕💞
----
मिटींग संपता-संपता जवळजवळ साडेसहा वाजले होते. गगन बावड्याचं आभाळ हलकं नारंगी झालं होतं, आणि दूरवर सूर्य अस्ताला जात होता.
समरने घड्याळ पाहिलं — “झाला उशीर… आता घरी पोहोचायला तर किमान साडेआठ तरी वाजतील.”
त्याने हलकंसं कपाळावर हात ठेवत दीर्घ श्वास घेतला, आणि लगेच मोबाईल बाहेर काढला.
स्क्रीनवर "शरयू 💞" असं नाव चमकलं.
तीने कॉल उचलताच तिचा गोड, शांत आवाज आला —
“हाय… मिटिंग संपली का?”
समरने कारचं इंजिन चालू करत उत्तर दिलं,
“हो, पण थोडा उशीर झाला… आता सरळ घरी पोहोचायला वेळ लागेल.”
ती थोडी काळजीत,
“बरं आहे ना सगळं?”
तो हलकं हसला,
“हो रे सगळं एकदम परफेक्ट आहे, पण तू एक काम कर घरी सांग — मी तुला बाहेर फिरायला घेऊन गेलोय. नाहीतर तुझी आई-बाबा चिंता करतील.”
शरयू थोडी गोंधळली, पण मग खळखळून हसली,
“म्हणजे सरळ सांगायचं की ‘समरसोबत बाहेर फिरायला गेलेय’ ?”
समर मिश्कीलपणे म्हणाला,
“मग काय आणि हो… उशीर झाला तरी चिंता करू नको. आजचा उशीर थोडा ‘खास’ असेल.” — असं म्हणत त्याने हलकं संगीत लावलं आणि गाडी डोंगर उतरत निघाली.
----
संध्याकाळचे रंग आता हळूहळू गडद होत चालले होते. आकाशात संधिप्रकाशाच्या केशरी आणि जांभळ्या छटा एकमेकांत मिसळत होत्या. त्या प्रकाशात समरची कार शरयूला घेऊन एका शांत, सुंदर हिलसाइड कॅफेकडे जात होती — शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या मिठीत. 🌿
गाडी थांबली. हलकं मंद वारा वाहत होता, झाडांच्या पानांतून येणारा सूर्यास्ताचा झोत तिच्या चेहऱ्यावर पडत होता.
समरने गाडीचं दार उघडून तिचा हात पुढं केला —
“या मॅडम, तुमचं वेलकम आहे या सीक्रेट डेटला.”
शरयू लाजत म्हणाली, “सीक्रेट म्हणजे?”
समर हसला, “अगं, आपल्या दोघांनाच माहिती असणार अशी डेट… .”
ते दोघं एका छोट्या टेबलावर बसले — टेबलावर मेणबत्तीची हलकी उजळण, बाजूला लाल गुलाबाची एक पाकळी, आणि दूरवरून येणाऱ्या वाऱ्यातल्या सुगंधात मिसळलेला कॉफीचा गंध. ☕
समर तिला बघत म्हणाला,
“तुला माहिती आहे का शरू, जेव्हा तू हसतेस ना… तेव्हा जग थांबतं.”
शरयू त्याच्याकडे पाहत मिश्कीलपणे म्हणाली,
“आणि जेव्हा तू असं बोलतोस ना… तेव्हा मी हसणं विसरते.”
दोघं एकमेकांकडे पाहत काही क्षण शांत झाले. नजरेतून हजारो गोष्टी बोलल्या गेल्या.
त्या क्षणी वाऱ्याचा एक झुळूक आला, तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले.
समर पुढं झुकला, हळूवार तिचे केस कानामागे सारले —
त्याच्या बोटांच्या स्पर्शाने शरयूच्या अंगावर हलके शहारे आले.
तिचा श्वास थोडा वाढला, ती हलकेच हसली.
त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली — पास्ता, गार्लिक ब्रेड आणि दोन कप हॉट चॉकलेट.
मधूनच शरयू त्याच्या काट्यावरून पास्ताचा घास घेत त्याच्याकडे धरते.
“खाऊन बघ… माझ्या हाताने.”
समरने तिच्याकडे पाहत हळूवार तो घास घेतला.
“अरे वा… आता पासून मला सगळं असंच खायचं आहे.”
ती हसत म्हणाली, “मग रोज भेटावं लागेल तुला…”
समर: “तोच तर प्लॅन आहे मॅडम.”
हळूहळू रात्रीचा अंधार गडद झाला. चांदणं त्यांच्या टेबलावर पडलं होतं.
दोघेही त्या क्षणात हरवले — संवाद थांबले, फक्त नजर आणि वारा बोलत होते.
थोड्या वेळानं त्यांनी कॅफे सोडलं. कारमध्ये बसताना शरयू थकलेली, पण आनंदी दिसत होती.
ती शांतपणे समरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली.
गाडीमध्ये मंद म्युझिक सुरू होतं — Pehla Nasha… Pehla Khumar…
आणि त्या सुरांमध्ये दोघं हरवले. 💞
गाडी तिच्या घरासमोर थांबली.
ती उतरली, पण थांबली थोडा वेळ —
“थँक यू समर… आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता.”
समर हळूच म्हणाला,
“मग असं अजून कितीतरी सुंदर दिवस आपण बनवूया…”
ती लाजत हसली आणि हळूच म्हणाली, “Good Night…”
“Good Night, Mrs. Soon-to-be Shirke Patil,” तो मिश्कीलपणे म्हणाला.
ती हसत निघून गेली, आणि गाडी पुढे निघाली.
----
घरात पोहोचल्यावर वंदनाताई आणि प्रताप हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते.
समर आत येताच प्रतापने हसत विचारलं —
“आला दादा! काय मग, गगन बावड्याची मिटिंग झाली का? की ?”
समर त्याच्याकडे पाहत म्हणाला —
“तुझं तोंड बंद ठेव… नाहीतर पुढच्या वेळी मी खोलीत बांधून ठेवीन.”
वंदनाताई हसत म्हणाल्या — “काय गंमत चाललीय तुम्हा दोघांची?”
प्रताप - “काही नाही आई, दादा गगन बावड्यात ‘बिझनेस’ मिटिंग करून आला.”
समर ने हसत एक कटाक्ष प्रताप कडे टाकला
सगळे हसले… आणि त्या हसण्यात एक सुंदर गुपित दडलेलं होतं —
त्यांच्या प्रेमाचं. 💞✨
- @ सौ. रोहिणी माने
माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞भाग १२
No comments:
Post a Comment