ग्राऊंडवर
पोहोचताच ढोल-ताशांचा आवाज दणाणून गेला.
नवीन मुलं-मुली
बाजूला रांगेत बसवलेले. त्यात आता शरयू आणि काव्याही सामील झाल्या.
मैदानाकडे
येणार्या समर भैय्या ला बघून सगळ्यांची धांदल उडाली होती.
कपाळावर आलेले
केस, चालण्यात पाटिलकीचा रुबाब, पांढरा शर्ट, ग्रे कलरची पॅंट, शर्टच्या बाह्या कोपरा
पर्यंत फोल्ड केलेल्या, त्यातुन जाणवणारे त्याचे भरदार बायसेप्स, नजरेत कमालीचा धाक.
त्याला पाहताच
सगळ्यांची वर्तणूक एकदम शिस्तीत झाली.
---
प्रतापने
हसत नवीन मुलांची ओळख करून दिली.
समर फक्त
शांतपणे मान हलवत होता.
पण जेव्हा
त्याची नजर शरयूवर गेली—क्षणभर त्याचं मन थांबल्यासारखं झालं.
ऑफिसमध्ये
गोड बोलत, तोंड वाकडं करत गेलेली तीच… आज ढोलघेऊन रांगेत उभी होती.
समरने पटकन
चेहऱ्यावरचा भाव दाबला. त्याचा आवाज घुमला—
“ नीट उभे रहा, ढोल वाजवायचाय म्हणजे खायचं काम नाही,
भक्ती आणि
शिस्त दोन्ही पाहिजे.
कोणालाही
उशीर, आळस किंवा खेळ नको.
नाहीतर जागा
रिकामी करावी लागेल. समजलं का?”
सगळ्यांनी
एकसुरात “हो” म्हटलं.
---
सराव सुरू
झाला.
प्रत्येकाला
ठरावीक बीट मारायला सांगितलं.
कुणी चुकलं
तर समरचा आवाज सरळ मैदानभर घुमायचा.
“ताल लक्षात घे… डाव्या हाताला जोर दे… वेळ
वाया घालवू नकोस!”
शरयूची पाळी
आली.
तिने ढोल
उचलून, चाटी डंका घट्ट पकडला.
पहिला ठेका
– दमदुम! दमदुम!
सुरुवातीचा
छान गेला, पण पुढे थोडं गोंधळली.
तिच्या नजरेतलं
उत्साहाचं तेज समरच्या नजरेला भिडलं…..तो काही क्षण तिला बघतच राहिला.
“स्टॉप!” समरने कडक आवाज दिला. सगळ्यांनी वादन थांबवलं.
तो सरळ शरयूच्या
जवळ आला.
तिच्या हातातून
चाटी डंका घेत म्हणाला –
“असं नाही… हा
डाव्या हाताचा ठेका असा धरायचा…”
त्याने तिच्या
हातावर आपला हात ठेवून चाटीची पकड दुरुस्त केली.
त्याच्या
बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना लागतो – आणि क्षणभर ती थरारते. त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने ती काहिशी संमोहित
झाली. क्षणभर तिच्या आणि त्याच्या डोळ्यांची नजरानजर झाली.
दोघांनीही
न बोलता बरेच काही अनुभवलं.
पण पुढच्या
क्षणी समर मागे सरकला, आवाज पुन्हा कठोर –“आता पुन्हा प्रयत्न कर.”
शरयूने हातात
चाटी डंका घेऊन पुन्हा ढोल वाजवला.
या वेळी ताल
अगदी अचूक बसला.
ढोलाचा आवाज
मैदानात घुमला, आणि तिच्या चेहऱ्यावरचं आत्मविश्वासाचं तेज समरला नकळत भुरळ घालून गेलं.
प्रताप हसून
म्हणाला –“वा शरयू, भारी वाजवलंस!”
शरयू आनंदाने
चमकली, पण तिची नजर मात्र कुठे थांबली?
सरळ समरकडे, तो डोळ्यांनी
होकार देतो. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरते.
---
त्या रात्री
शरयू झोपली नाही…..मनात सारखा ढोलाचा ठेका आणि समरची
नजर घुमत होती.
हा एवढा कडक
का वाटतो, पण तरीही त्याच्यात काहीतरी वेगळं का जाणवतंय?.....
तिला स्वतःलाच
समजेनासं झालं.
ढोलाच्या
पहिल्याच सरावाने शरयूचं मन पूर्णपणे वेडं झालं होतं.
ताल, आवाज,
मैदानातली ती उर्जा… आणि त्याचबरोबर समर शिर्के पाटीलची
नजर.
तो स्वभावाने
कडक असला तरी त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं, जे शरयूच्या मनाला सतत कुरवाळत
होतं.
---
पण घरी परतल्यावर
वेगळीच दुनिया होती.
आई-वडील शरयूला
रोज वेळेवर परत यायची ताकीद देत होते.
आईने विचारलं
–
“हे बघ शरयू, ढोल वाजवणं ठीक आहे… पण अभ्यासाला कमी पडायला नको, आणि उशीर झालेला आम्हाला
चालणार नाही.”
शरयू थोडी
नाखूष होत -
“अग आई, मला एकदा तरी संधी दे ना. ढोल
म्हणजे माझं स्वप्न आहे…
आणि मी अभ्यासात
पण कमी पडणार नाही, प्रॉमिस!”
आईने मान
हलवली, पण शरयूच्या डोळ्यांतली चमक पाहून काही बोलली नाही.
दुसऱ्या दिवशी
मैदानावर सराव जोरात सुरू होता.
पण शरयू मधेच
चुकत होती, तीच्या चुकिच्या बीट मुळे बाकीचे डिस्टर्ब होत होते, त्याने तिला डोळ्याने
खुणावत सांगण्याचा प्रयत्नही केला…..,पण त्याला दिसलं की सरावाच्या मध्ये
शरयू काव्याशी बोलता-बोलता हसतेय,
त्याला ते
अजिबात आवडलं नाही.
तो सराव थांबवत
गरजला –
“ओ ठाले पाटील! इथे लोक गप्पा मारायला नाही, ताल शिकायला येतात .
जर टाइमपास
करायचाच असेल, तर घरी जा.”
सगळे स्तब्ध…..शरयूचा चेहरा उतरला……तिच्या
डोळ्यांत पाणी दाटलं.
---
ती सरळ ढोल
खाली ठेवून मैदानाबाहेर निघून गेली.
प्रताप गोंधळला
– “दादा, थोडं जास्तच झालं नाही का?”
समरने रागानेच
उत्तर दिलं – “शिस्त मोडणं मला चालत नाही. कुणीही असो.”
---
त्या रात्री
शरयूच्या डोळ्यांत झोप नव्हती.
तिला रागही
आला होता, आणि वेदना पण.
मी काही चुकीचं
केलं का खरंच? की तो मुद्दाम माझ्यावर राग काढतोय?
तिच्या मनात
प्रश्नच प्रश्न होते.
पण त्या प्रश्नांच्या
धाग्यात एक वेगळंच गुपित गुंतलेलं होतं –
कारण कितीही
राग आला तरी तिच्या मनात समरबद्दलचं आकर्षण वाढतंच चाललं होतं.
------
दुसऱ्या दिवशी शरयू मैदानावर आलीच नाही.
सगळ्या मुलींमध्ये कुजबुज सुरू झाली –
“काल समर भैय्याने खूप सुनावलं म्हणे… म्हणून आली नाही का?”
प्रतापने समरकडे पाहत विचारलं –
“दादा, काल तू थोडं जास्त बोललास बहुतेक. आज येईल की नाही माहीत नाही.”
समरने कठोर चेहरा करत उत्तर दिलं –
“शिस्त मोडायची असेल तर नाही यायचं. मला अशा लोकांचा काही उपयोग नाही.”
पण आतून मात्र त्याला सतत शरयूचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता —
डोळ्यांत दाटलेलं पाणी, आणि तुटलेला आत्मविश्वास.
त्याच्या मनाला काहीतरी टोचत होतं.
पुढच्या दिवशी शरयू मैदानात आली.
पण या वेळेस तिच्या डोळ्यांत आधीसारखं तेज नव्हतं.
तिने ढोल उचलला, ठोका मारायला सुरुवात केली…
पण ताल चुकत होता.
समरने पाहिलं.
सगळ्यांना थांबवत तो तिच्याकडे आला.
कडक आवाजात म्हणाला –
“काय झालंय तुला? कालपासून लक्ष नाहीये…
असं करायचं असेल तर घरी बस. इथे कमिटमेंट लागते.”
शरयूचा संयम तुटला.
डोळ्यांत पाणी आणत म्हणाली –
“नेहमी माझ्यावरच का ओरडता? मी इतकी वाईट आहे का?
मी मनापासून प्रयत्न करतेय… पण तुम्हाला दिसतंच नाही.”
मैदान शांत झालं होत.
प्रताप पुढे आला – “दादा, सोड ना… मुलगी खरंच मेहनत करते.”
समर काही बोलला नाही.
क्षणभर शरयूच्या डोळ्यांत पाहिलं –
तिथं रागही होता, पण त्याहून जास्त होती प्रामाणिक वेदना.
त्याला जाणवलं – ती खोटं बोलत नाहीये.
तो निघून गेला, पण त्या रात्री त्याच्या मनात तिचे शब्द घुमत राहिले –
“मी मनापासून प्रयत्न करतेय… पण तुम्हाला दिसतच नाही.”
त्या दिवसानंतर समरने थोडं वेगळं ठरवलं.
तो अजूनही शिस्त पाळायला लावत होता,
पण शरयूवरचा कठोरपणा थोडासा मऊ झाला.
तो नकळत तिच्याकडे जास्त लक्ष देऊ लागला.
शरयूला देखील जाणवलं –
तो अजूनही कठोर आहे, पण कधी कधी त्याच्या डोळ्यांतली नजर वेगळीच असते…
जणू काळजी घेणारी.
दोघांच्या नात्याचं रूप अजून ठरलेलं नव्हतं –
गैरसमज होत होते, शिस्तीचा ताण होता…
पण त्या सगळ्याच्या आड काहीतरी नाजूक धागा बांधला जात होता.
- @ सौ. रोहिणी
माने
माझिया प्रियाला प्रीत कळेना....💞 भाग ३
No comments:
Post a Comment