4 Oct 2012

चारोळ्या

क्षितिजापलिकडचा एक गाव
आपल्याला आंदण दिलाय देवाने
तो गाव आपल्याला ठाऊक आहे
स्वप्नं या नावाने...

मलाच माहीत नसलेलं एक दू:
माझ्या मनात साठून आहे
बरेचदा मी विचार करतो
नक्की याचा योग कुठून आहे...

वाटतं तुला चोरून भेटताना
कोणी मला बघावं
आणि त्याच्या देखत ऐटीत मी
तूझ्यासवे निघावं....

तू बुडताना मी तुझ्य़ाकडॆ धावलो
ते मदतीला नव्हे..सोबतीला
नाहीतर मला तरी
कुठे येतय पोहायला...

कागद जाळता येतो
पण शब्द जाळता येत नाही
आणि तो आठवायचा नाही हा नियम
मनाला पाळता येत नाही...


No comments:

Post a Comment