4 Oct 2012

चारोळ्या

आम्ही काय रंग
बारा महिने उधळतो
आमचा रंग साधा नाही ,कारण
तो अंतरंगात विरघळतो....

तू निघून गेल्याचं दू: नाही
पण तरी वाटतं....
या वर बाकी कुणाला
बोलायचा हक्क नाही.

कितिदा मी म्हणतो टाळायचं
तुझ्या रस्त्यावरून जाणं
तुझ्या रस्त्यावरून गेलोच तर
तुझ्या खिडकी कडे पाहणं.....

खिशात मावेल एव्हढा एकटेपणा
प्रत्येकाजवळ असतो
ग्रुपफोटो बघताना तो
चूकून डोळ्यात दिसतो...

ओंजळ भरून मागितलं तर
ओंजळ भरून मिळतं
पण आपली ओंजळ भरली हे
कितीजणाना कळतं.....

No comments:

Post a Comment