4 Oct 2012

चारोळ्या

तिन्हीसांजेला माझं मन
जरासं काहूरतं
आता सावली पण जाणार म्हणून
जरासं हुरहुरतं...

नेमका माझा रस्ता सुद्धा
चाफ्यापाशी वळण घ्यायचा
आणि नजरेला रोखलं तरी
चार पावलांवर तुझा गाव यायचा...

दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्रं उजळतं
तू दाराशी आल्यावर....

गजरे तू माळून येतेस
गंध मला बिलगून बसतो
आणि घरी गेल्यावर प्रत्येकजण
जरा खोचकपणेच हसतो...

सगळे देखावे बघून झाले
तुझ्याकडे पाहणं टाळण्यासाठी
आता आणखी काय करू?
हे सगळं तुला कळण्यासाठी...

No comments:

Post a Comment