9 Oct 2012

प्रेमपत्र

बायकोने नव-याला लिहिलेले प्रेमपत्र
माझ्या प्राणप्रिय .............
प्रेमफुलास ..........................

" कागा सब तन खय्यो 
चून चून खय्यो मांस,
मगर ये दो नयन मत खय्यो 
इन्हे पिया मिलन कि आंस."
कॉलेज मध्ये असताना प्रेम म्हणजे केवळ एक आकर्षण असतं असं वाटायचं कुणी म्हणायचं रात्री झोप येतं नाही कशात मन रमत नाही तेव्हा बोलणा-या वर मी हसायचे आणि हि सगळी नाटकं आहेत म्हणून चिडवायचे पण आता ................
तुझ्या प्रेमात पडल्यावर .........
माझ्या रात्री जागायला लागल्या 
चांदण्याही आता सवईनं ........
सलगीनं वागायला लागल्या .......
आपल्या आवडत्या व्यक्तीपासून जो पर्यंत आपण दूर जात नाही तो पर्यंत खरं प्रेम काय असतं हे कळत नाही दूर गेल्यावर त्या व्यक्तीची आठवण मन विचलित करून जाते मन हि आठवणीच्या देशात रमून जातं परंतु परत येतांना त्याला असंख्य यातना होतात आणि हे मन आवरायचं म्हटलं तर मोठा गुन्हाच आणि तो करणं फार महा कठीण जमतंच नाही .............
जे होऊ नये तेच होऊन बसलंय 
तुझ्याकडे पाठवत नाही म्हणून 
माझं मन माझ्यावर रुसलंय 
आता तुम्हीच सांगा काय करावं ह्या मनाचं तुमच्या आठवणींन फार रडायला येतं पण आता रडायला अश्रूही नकार देतात खूप झालं अश्रू  गाळणं आता हसायला शिक म्हणतात. तुमच्या असंख्य आठवणींचा माझ्या मनावर ताबा आहे माझं माझं म्हणावं असं माझ्या जवळ काय उरलं आहे श्वासाश्वासावर तुझंच नाव कोरलं आहे माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला तुमची सवय झालीये इतकंच काय तर ......................
तुझ्या भेटीनंतर सख्या 
मी माझी राहिले नाही 
आरशात सुद्धा अरे राजा 
मी मला पाहिले नाही.
आज पत्र लिहिताना तुमची प्रत्येक गोष्ट तुमचं हसणं बोलणं रागावणं आणि मारणं सुद्धा बरं का हवं हवंस वाटतं नकोसा वाटतो तो फक्त तुमचा विरह तुमच्या सहवासात घालवलेला तो प्रत्येक क्षण आज मला हवा आहे हा माझा स्वार्थ नाही किंवा शारीरिक आकर्षण हि नाही तुमच्यावर असलेलं माझं खरं खुरं प्रेम आहे कदाचित अगोदर ज्याला मी किंवा तुम्ही प्रेम समजत होतो ते शारीरिक आकर्षण असेल हि पण आज जी ओढ आहे ती मनाची प्रेम हि एक सुंदर भावना आहे. कधी कधी वाटतं सगळी बंधन झुगारून परत तुमच्या कडे निघून यावं पण ते शक्य नाही कारण.......
तुळशी कडे दिवा लावताना 
तुला कुंपणा बाहेर मी पाहिलं 
पण मी येऊ शकले नाही 
कारण मध्ये कुंपण उभं राहिलं  
हे कुंपण आपण आपल्या हाताने बांधलय पण हे बांधन गरजेच होतं कारण ते आपलं कर्तव्य आहे व त्यामुळे कुणालातरी मिळणारा आनंद हा क्षितिजा पलीकडचा आहे हे मला मान्य आहे पण ह्या अमान्य आहे कुंपणाच्या बाहेर राहणारे तुम्ही माझी घुसमट तुम्हाला कधी कळलीच नाही ह्या एकाच गोष्टीची मनाला खंत वाटते. प्रत्येक वेळेस मीच स्वतहून तुम्हाला सांगत आले आणि कदाचित त्यामुळे माझ्या कुम्पानातील घुसामातीबद्दल तुम्हाला काही खंत वाटली नाही ...........
पुसणारं कोणी असेल तर .....
डोळे भरून यायला अर्थ आहे 
कुणाचे डोळे भरणार नसतील 
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे 
काय लिहावं आणि काय लिहू नये लिहायला सांगायला खूप गोष्टी आहेत पण तुमच्या काही लक्षात राहत नाही सांगून काय उपयोग लिहायचं म्हटलं तर कागद कमी पडेल पेनाची शी संपून जाईल आणि विरहाचा काळ हि संपून जाईल पण असं म्हणतात कि विरहानं प्रेम आणखी वाढतं बघूया ........

                                                                                                                 
     
                                                                                                                     - तुमचीच  


No comments:

Post a Comment