विश्वाच्या या अवाढव्य पसार्यात एक पृथ्वी आहे, एक चंद्र आहे. हजारो वर्ष ते एकमेकांशी परिचित आहेत. इतक्या ओळखीनंतरही आपल्याला चंद्राबद्दल काय वाटतं, ते पृथ्वीला कळलेलं नाही, तर मी तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर कसं रे देणार ? मला एकच माहित आहे. आजतागायत चंद्र कधी पृथ्वीच्या कक्षेत आलेला नाही, किंवा त्याच्या ओढीने ती चंद्राला भेटायला गेलेली नाही. तप्त सूर्याभोवती फिरत राहणं हेच तीच नशीब ………!
- सुहास शिरवळकर