कधीच पूर्ण मार्कं मिळत नाहीत
कारण मार्कं देणारा आणि घेणारा
पाऊस दोघानाही पूर्ण कळत नाही..
खपली सुद्धा कधीकाळी
जखमेचीच एक भाग होती
फरक इतकाचकी तेंव्हा तिथे
वेदनेला जाग होती...
उडून गेलेली सगळीच पाखरं
पून्हा परतत नाहेत झाडावर
काहीना नवा आसरा मिळतो
वेशीवरच्या ओढ्यावर..
देहावरचे स्पर्ष जेंव्हा
मनापर्यंत पोहोचतात
मला वाटतं कवितेचे
नवे शब्द तेंव्हा सुचतात
पहाटेला रात्र
ओढ्यावर नहायला बसली
आणि सकाळ होऊन येताना
कोवळी ऊन्हं नेसली...
No comments:
Post a Comment