तो आनंद खरा होता
बाकी क्षण क्षणापुरते
पण तो क्षण जरा अपूरा होता..
माझ्या ओंजळीत
काय काय मावतं...
आकाश सुद्धा कधी कधी
या खळग्यात यायला धावतं...
पाऊस निमुट पडत राहिला
दुपार ढळे पर्यंत
जसा तू माझ्याकडॆ बघत राहतोस
मला कळे पर्यंत....
फुलाच्या पाकळीला
थेंबाचं ओझं...
मी तुझ्याकडे पाहिलंकी
तसं होतं तुझं..
वेड्या क्षणी भास होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा
No comments:
Post a Comment