उन्हासोबत पाऊस येतोना
तेंव्हा हमखास असं होत
तुला खेटून बसण्य़ाचं खूळेपण
मनात दाटून येतं...
पावसाचे दिवस नसतात
रात्री असतात पावसाच्या
ज्या निजू देत नाहीत
आठवणी काढत दिवसाच्या
मागे वळून पाहिलं तर
मी सोडून आलेला गाव
आणि माझ्या सोबत म्हणशील तर
तू मोडलेला डाव...
आपसूक डोळे भरून येतात
रडायचं नाही ठरवल्यावर
आणि मन काहीतरी शोधत राहतं
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर...
तिन्हीसांजेला परतलेला पारवा
शोधत राहिला आडोसा
का कोणजाणे पण त्याला बघून
मी हळवा झालो थोडासा...
तेंव्हा हमखास असं होत
तुला खेटून बसण्य़ाचं खूळेपण
मनात दाटून येतं...
पावसाचे दिवस नसतात
रात्री असतात पावसाच्या
ज्या निजू देत नाहीत
आठवणी काढत दिवसाच्या
मागे वळून पाहिलं तर
मी सोडून आलेला गाव
आणि माझ्या सोबत म्हणशील तर
तू मोडलेला डाव...
आपसूक डोळे भरून येतात
रडायचं नाही ठरवल्यावर
आणि मन काहीतरी शोधत राहतं
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर...
तिन्हीसांजेला परतलेला पारवा
शोधत राहिला आडोसा
का कोणजाणे पण त्याला बघून
मी हळवा झालो थोडासा...
No comments:
Post a Comment