6 Sept 2012

चारोळ्या

पावसाच्या सरीनंतर
भिजून गेलं रान...
आणि माझ्या हाती राहिलं
लाजाळूचं पान....

हसायच्या आधी
मला सराव करावा लागतो
मनावरचा घाव
जरा दाबून धरावा लागतो...

घराच्या भिंती पडल्यावर
मला क्षितीज दिसायला लागलं
आणि भांबावलेलं मन माझं
जरासं हसायला लागलं....

तुझा तो.. दाराआडूनचा कानोसा
आणि माझ्यासाठी..
ते दार म्हणजे
ओढ लावणारा आडोसा...

थवा उडून गेल्यावर मी थांबतो
मागे राहिलेल्या पाखरासाठी
म्हणून खूपदा गाव सोडून
माझा वेळ जातो नदीकाठी..




No comments:

Post a Comment