आभाळ फक्त पाहत राहवं
भिजता आलं नाही तरी
मनोमन नाहत राहवं...
आठवायला खूप आहे
आठवत बसलं तर..
आणि मी तसा बसतोही..
...ते माणूस दिसलं तर
सावळं आभाळ आणि
कोवळं कोवळं ऊन
आणि त्यात ही झूळूक म्ह्णजे
तू येऊन गेल्याची खूण....
घननिळा पाउस मनात
सुद्धा चांगलाच कोसळतो.
थोडीशी पडझड करुन
शेवटी अलगद पुर ओसरतो.
बरीच कोडी म्हणे..
पावसात सुटतात
जेंव्हा कुणाचे वीलग् झालेले ओठ
काही नं बोलता मिटतात...
No comments:
Post a Comment