28 Sept 2012

चारोळ्या

मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
अर्थात कुणाचं होऊनजाणं
मनापासून यायला हवं...

शहाणं असण्यासाठी
थोडं वेडं असावं लागतं
आणि हल्लीतर फक्त
शहाण्यासारखं दिसावं लागतं...

आपण दोघं इकडनं जाऊ
म्हणजे पाऊलवाट होईल
आणि पून्हा इथे येऊ तेंव्हा
त्याची वहीवाट होईल.

पावसाळ्यातल्या नदीची
उन्हाळ्यात पाऊलवाट होते
काय होत असेल जीवाचं
जेंव्हा ती आपल्या पायाखाली येते

सगळी दारं लाऊन घेतली पण
मन घराबाहेरच राहिलं
म्हणून मिटल्या डोळ्य़ानी मी तुला
मनसोक्तं रंगताना पाहिलं...

No comments:

Post a Comment