भिंतीकडे तोंड केलं म्हणजे
जगाकडॆ पाठ होत नाही
याचा अर्थ इतकाचकी आपल्याला
जगाला तोंड देता येत नाही.....
तो निवांत उतरलेला थवा...
आणि दबा धरून बसलेला शिकारी
आणि माझ्यापेक्षा वरचढ...
त्याची नजर विखारी...
लहानपणी...
बरं होतं
डोंगरा मागचं जग
खरं होतं..
जगणं आणि जगून दाखवणं
यातला फरक आता मला कळतोय
तू नाहीस तर भर पावसात मी
आतकुठेतरी जळतोय......
माझ्या मनाचा एक कप्पा
मी कुणाला उघडू देणार नाही
देणार नाही आपलं म्हणायचं
नाहीतर तो मलाही उघडता येणार नाही.
- चंद्रशेखर गोखले
जगाकडॆ पाठ होत नाही
याचा अर्थ इतकाचकी आपल्याला
जगाला तोंड देता येत नाही.....
तो निवांत उतरलेला थवा...
आणि दबा धरून बसलेला शिकारी
आणि माझ्यापेक्षा वरचढ...
त्याची नजर विखारी...
लहानपणी...
बरं होतं
डोंगरा मागचं जग
खरं होतं..
जगणं आणि जगून दाखवणं
यातला फरक आता मला कळतोय
तू नाहीस तर भर पावसात मी
आतकुठेतरी जळतोय......
माझ्या मनाचा एक कप्पा
मी कुणाला उघडू देणार नाही
देणार नाही आपलं म्हणायचं
नाहीतर तो मलाही उघडता येणार नाही.
- चंद्रशेखर गोखले
No comments:
Post a Comment