24 Aug 2012

चारोळ्या,

रात्र ओसरली पण
दिवस हाताशी येइना
कारण मनात उगवलेला चांदोबा
माघारी जाईना...

तुझ्यावर रागवायचं म्हणजे...
मलाच शिक्षा
मग शहाण्यासारखं वागलं तर काय वाईट
त्या पेक्षा...

तुझी सावली सुद्धा ओळखेन
तू कधी हरवलास तर...
पण मी बाकी राहीनच कशी
तू माझ्यापसनं दुरावलास तर

सगळच कुठे खरं असतं
जे आपण खरं म्हणून धरतो
कितिदा आपण आपली घागर
पाण्याशिवाय भरतो...

कोणी नं सांगता श्रावण
ओळखता यायला हवा
कारण श्रावण म्हणजे दरवर्षी
एक अनुभव असतो नवा...

No comments:

Post a Comment