24 Aug 2012

चारोळ्या

टाळता आलं असतं तर नक्कीच
मी तुझ्य़ाकडे पाहयचं टाळलं असतं
बाकी कुणाला नाही पण
तुला ते नक्कीच कळलं असतं...

माझ्या रागाचं मुख्यं कारण
हेच आहे
कायम माझ्या मागचा शहणा
आणि माझ्य़ा पायाला ठेच आहे

तिरप्या उन्हातली गम्मत
तीरप्या उन्हात कळते
जेंव्हा माझी सावली लांबत जाऊन
तुझ्या सावलीला मिळते....

चंद्रालाही माझं घर
तुझ्यामुळे माहीत,कारण
मी रात्री त्याच्या सोबत जागतो
तुझ्य़ा स्वप्नांसहीत...

आपण ह्याचा हा आणि त्याचा तो करत
किती कप्प्यात वाटले जातो
कितिदा नको असताना
किती तुकड्यात फाटले जातो...

-चंद्रशेखर गोखले

No comments:

Post a Comment