24 Aug 2012

कान्हा


यशोदेचा खटयाळ  कान्हा बाई गं .......,
खोड्या करितो घरावर काही ...........!!धृ !!


एके दिवशी गं केली यान गंमत
माझ्या पलंगावर सोडला मुंगस
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!१!!


एके दिवशी गं केली यान खोडी
सारी गाई वासरे सोडी
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!२!!


एका जनार्दनी लई राधा
शरण आले तुला मुकुंदा
भर रस्त्यावरी लोक हसती सारी .......!!३!!

No comments:

Post a Comment