30 Jul 2012

चारोळ्या

पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर मरणसुद्धा व्यर्थ आहे.

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं
तू खूपसं दिलास तरी
आणखी मागायचं होतं

इथं वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्या शिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.

-चंद्रशेखर गोखले


No comments:

Post a Comment