30 Jul 2012

विचार

  • जे स्वतःच्या पुस्तकाची पाने उघडी ठेऊन वावरतात, त्याला वाळवी खात नाही, पण कोणी आपले रहस्य जाणिल व आपण हलके ठरू म्हणून जो स्वतःचे पुस्तक बंद ठेऊन वावरेल त्याची पाने आतल्या अंधारात सडून जातील.
  • जीवनात सर्वांना प्रसन्न राखायला जल तर शेवटी वसंताचा गुलाबी काळ हातातून निघून जाईल.
  • पाऊस  आणि जमीन याचं किती सुंदर प्रेम पावसाचा प्रत्येक थेंब झेलायला आतुर असते.
  • प्रीती हि कधी उमलणा-या फुलासारखी असते तर कधी उफाळणा-या ज्वालेसारखी दिसते, ती कधी हरिणीचे रूप घेते तर कधी नागिणीचे रूप घेते ती कधी जीव घेते तर कधी जीव देते.
  • प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे   देतं ते प्रेम कुणावरही असो मात्र ते खरखुरं प्रेम असायला हवं! ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं! ते स्वार्थी लोभी किंवा फसवं असता कामा नये प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती ख-या प्रेमात असते.
  • जीवनात प्रेम हि एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे. कर्तव्याला कठोर व्हावं लागतं पण हाच धर्माचा मुख्य आधार आहे.
  • आठवणी कशा असतात ? स्वच्छंद फुलासारख्या ? पाठशिवणीचा खेळ खेळणा-या मुलीसारख्या हळूहळू मिसळत जाऊन चित्र सौंदर्य वाढविना-या रंगासारखा वर्षाकालात आकाशात स्वैरपणे   चमकणा -या विजेसारख्या ? कुणाला ठाऊक ?
  • संकटे कुणाला चुकली आहेत! उलट या जगात ती सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात.
  • या जगात जन्माला येण्याचा मार्ग एकच आहे, तसं मरणाचं नाही , मृत्यू अनेक वाटांनी येतो! कुठूनही येतो!
  • रिकामा कलश भरला जात असताना आवाज करतो, तो पूर्णपणे भरल्यावर निशब्द होतो. प्रेमिकांची हृदये अशीच असतात. ती पूर्णपणे भरल्यावर तिथे शब्दांना अवकाश नसतो.
  • प्रीतीची भूक भूक नव्हे तर काय ? मध्यान्हीच्या क्षुधेसारखी, मध्यरात्रीच्या निद्रेसारखी, ग्रीष्मातल्या तृशेसारखी असलेली प्रीतीची हि भूक मोठी विचित्र असते. जितकी सूक्ष्म तितकीच प्रखर.
  • स्त्रियांबरोबर चिरकाल स्नेह ठेवणं शक्य नसतं कारण त्यांची हृद्य लांडग्यांच्या हृद्यासारखी असतात.
  • माणसांच्या पोटात शिरण्याचा मार्ग त्याच्या हृदयातून असतो .
  • मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हि सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिय हे घोडे उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्यांचा भोक्ता आहे.
  • माणसाच्या रक्ताची चटक  लागलेला वाघ आणि स्त्रीच्या सौंदर्यावर मोहून गेलेला पुरुष दोघेही सारखेच .
  • कुठलीही वासना वाघासारखी असते काय ? तिला ज्या उपभोगाची एकदा चटक लागते, त्याच्यामागे ती वेड्यासारखी धावत सुटते! वासनेला फक्त जीभ असावी ! कान, डोळे, मन, हृद्य काही काही देवाने तिला दिलेले नाही. तिला दुसरे तिसरे काही कळत नाही. कळते फक्त स्वतःचे समाधान !
  • वायू हा जगाचा प्राण आहे त्याच्या मंद लहरी सदैव सर्वांना प्रिय वाटतात; पण तोच झंझावाताचे स्वरूप धारण करतो. तेव्हा जगाला नकोसा होतो प्रत्येक वासनेची स्थिती अशीच असते.
  • उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही आहुतींनी अग्नी जसा भडकतो. तशी उपभोगाने वासनेची भूक अधिक वाढत जाते.
  • पाप आणि पुण्य ह्या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत या जगात सुख आणि दुख या दोनच काय त्या ख-या गोष्टी आहेत. बाकी सर्व माया आहे. पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत. 

No comments:

Post a Comment