सायंकाळची कातरवेळ. सूर्य पश्चिमेच्या डोंगराआड जाता जाता आपल्या अंतरंगातले, इंद्रधानुतले सप्तरंग या निरभ्र आकाशावर उधळत होता. आकाश त्या विविध रंगानी उजळून निघाले होते. झाडांच्या सावल्या दिवसभर उभ्या राहून थोडा विसावा घेत झाडाच्या पायथ्याशी उद्याची पहाट उगवेपर्यंत पहुडल्या होत्या. चांदण्यांनी आकाशात गर्दी केली. अशा वेळी माझ मनही हळवं होत होत. एखाद्या सुंदर तळ हातावर मेंदीचा केशरी रंग खुलून निघावा आणि ते हात हातात घेऊन त्या रंगाना स्पर्श करावा त्या मेंदीचा गंध श्वासाश्वासात घेऊन अवती भोवती असाच दरवळत रहावा असं वाटत होत.
सायंकाळ मंदावली निशा आपलं अस्तित्व जागवायला लागली. मंदिरातले दिवे वाऱ्याच्या झुळकीने हेलकावू लागले. गाभाऱ्यातून येणारा घंटेचा आवाज चोहीकडे निनादू लागला अगरबत्तीचा आणि त्या ईश्वर चरणी वाहिलेल्या फुलांचा गंध माझ्या अवती भोवती दरवळून श्वासाश्वासात फुलू लागला. मी सत्य आणि वास्तवात जाणीवा शोधू लागलो. आता सर्वत्र अंधाराच साम्राज्य पसरलं होत. आकाश ढगाळून येऊन, तरीही चांदण्या मुक्तपणे लुकलुकू लागल्या पौर्णिमेचा चंद्र उजळून प्रकाशमान झाला. ढगांमुळे त्याचा प्रकाश कधी लख्ख तर कधी धूसर होऊ लागला. त्याच्या उजळपणाचा प्रकाश मी न्याहाळत डोळ्यातून साठवू लागलो. माझी नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. इतक्यात हजारो चांदण्यातली एक चांदणी जी चंद्राच्या समीप असलेली मला म्हणाली -
" ए मेहपीयार
इतना भी मत देखो की,
हमारे चांद को तुम्हारी
नजर न लग जाए ! "
मी तीच्या या बोलण्याने भारावून गेलो आणि पुढे म्हणालो -
" ऐ चांदणी
तुम्हारे चांद से भी खुबसुरत
चांद मेरे पास हैं ! "
माझ्या या वाक्यावरून ती प्रश्नांकित होऊन मलाच म्हणाली - " वो कैसे..............? "
मग मी म्हणालो -
" ए चांदणी, जरा अपनी
पलके उठाकर देखना, इस धरतीपर
कही तो वो तुझे नजर आएगा ! "
" सिर्फ दिल कि आवाज उसे देना
तुझे मेरा चांद दिखाई देगा ! "
माझ्या या प्रश्नांकित वाक्याने ती शोधू लागली तिला. शोधता - शोधता ती बावरून गेली आणि थोडासा विसावा घेत मला म्हणाली -
" आपका चांद हमें नजर नहीं आया ! "
माझ्याकडून न राहवत मी म्हणालो - ' तू मनापासून नाही शोधलस तिला मी काय म्हणतो ते आता ऐक जरा -
" दिल से आवाज दे रहा है,
तुम गौर से सुनो जरा,
उस चांद का परदा उठाकर तुम्हे दिखाएंगे
मेरी इन आंखोमें खो जाओ जरा !"
ती माझ्याकडे एक टक पाहत राहिली आणि माझ्या हृदयातील सादेला प्रतिसाद देऊ लागली -
" चांद आंगडाईया ले रहा है
चांदणी मुस्कुराने लगी है
एक भूलीसी कहाणी
मुझे फिर याद आने लगी है ! "
या काव्याफुलांनी ती खळखळून हसली तिचं मन हळवं झालं ती डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली -
" ऐ हमसफर सबकुछ भूलाकर
हमारा दोस्ती का पयाम काबुल करना,
जिंदगी अधुरी लगने लगी है
अब तुम्हारे बिना ...............! "
तिच्या या मैत्रीच्या बंधनाला मी होकार दिला, ती फुलली आणि बेधुंद होऊन चमचमत म्हणाली -
" ऐ मेरे हमसफर
हम तो आप पर हो गये फिदा
अब न कटेगा ये सफर अधुरा
तुम्हारे बिना ............! "
तिच्या या बोलण्याने मी हळवा झालो, उत्तर देत तिला म्हणालो -
" ऐ सनम मानता हुं
जालीम है दिल का लगना,
मगर, ये दिल किसी और का हो चुका है
दुबारा ऐसी बात भी न करना,
क्युं की मुश्कील होगा
बहते आंसूओ को संभालना ! "
माझ्या या बोलण्यान खरंच तिच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या, तिचा कंठ दाटून आला. पापण्यांच्या कडावरून तिच्या अश्रुधारा ओसंडून वाहू लागल्या. तिचा चेहरा हळूहळू मंदावू लागला. माझ्या साऱ्या शरीरावर धुकं साचलं पण हे धुकं केवळ धुकं नव्हत तर तिच्या मनातल्या दुखाची मला एक अंधुकशी भेट होती कारण ती मला अंधारातच भेटली पण आता मी उजेडाचा धनी होतो, पण तरीही तिच्या सांत्वनासाठी व तिला सावरण्यासाठी मी तिला म्हणालो -
" अश्क आंखो में आये तो पीले
दिल जो रोये तो होठो को सीले
ऐ मोहब्बत तेरे आंसू ओ पे
अब हंसी उनको आने लगी है ! "