चांदवड येथील प्रसिद्ध श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले अतिशय नयन रम्य असे ठिकाण बाबराने हे मंदिर पाडल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा उद्धार केला त्रेतायुगात
वनवासात असतांना प्रभू रामचंद्रांनी या नागरी वरून प्रयाण केले.
चंद्रेश्वर परिसरातून जातांना त्यांना तहान लागली. पाणी नसल्याने त्यांनी
पाण्यासाठी जमिनीत बाण मारला. जमिनीतून पाणी निघाले. ती जागा म्हणजे ह्या
मंदिरा जवळील गणेश टाके होय. हे पाणी कधीही आटले आसे स्थानिक लोकांना आठवत
नाही. चंद्रेश्वराच्या डोंगरावरून सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य पाहताना मन हरखून जाते
No comments:
Post a Comment