18 Sept 2011

चारोळ्या

प्रेम म्हणजे काय रे ?
दुधा वरची साय रे
थोड़ी उब मिळता
भसकन उतू जाय रे
 
तुझ्या भेटीनंतर सख्या मी
माझी राहिले नाही
आरशात सुद्धा अरे राजा मी
मला पाहिले नाही
 
मूक मूक राहून तुझ
नुसतच पाहत राहन
गोठलेल्या नदीच जस
बर्फा खालून वहान
 
तुलशी पुढे दिवा लावताना तुला
कुंपना बाहेर मी पहिल
पण मी बाहेर येऊ शकले नाही
कारण मधे कुंपण उभ राहिल
 
मरताना वाटल आयुष्य नुसतच वाहून गेल
मला जगायचय मला जगायचय म्हणताना
माझ जगायचच राहून गेल
 
लोकांच अनुकरण करण
मला जमत नाही
वेगळ काही केल तर
ते लोकांना खपत नाही

No comments:

Post a Comment