तुम्हास……
सर्वप्रथम आयुष्यात / जीवनात यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
सर्वप्रथम आयुष्यात / जीवनात यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
खरं म्हणजे मी स्वतः खुप मोठी नाहीपण तरीही जीवन यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाशी अशी खुनागाठ बांधावी लागते की यशस्वी झाल्यानंतर ती गाठ आपल्या मनाशी घर करुन असते की ,या निर्धारानेच मी यशस्वी आहे असे आपण म्हणत असतो पण पण तत्पूर्वी ……….
हाच तो काळ आहे गरुडाचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा , सलसलत्या रक्ताला आणि जीवनाला दिशा देण्याचा ,हाच तो कालखंड . जीवनाचे स्वप्न बघून त्या स्वप्नांना वास्तवात उतरवन्याचा हाच तो काळ आहे . स्पर्धेच्या मैदानात गुनवत्तेचा पराक्रम गाजवन्याचा जो ह्या पराक्रमात तरबेज त्याच्याच गळ्यात विजयाची लक्ष्मी हार घालते. विजयी व्हायचे असेल तर स्वप्नात मश्गुल राहून चालत नाही , जो स्वप्नात मश्गुल राहिला त्याच्या जीवनात शोकांतिका अटल आहे .
आज स्पर्धेत टिकायाच असेल तर चिखलात फसून चालत नाही त्यासाठी आपल नान आस बनवाव लागतं की ते चिखलात जरी पडलं तरी त्यान टन टन असा आवाज केला पाहिजे तर आपण उभे राहू
शकतो अन्यथा …….
जो पर्यंत वेळ आपल्या हातात आहे तो पर्यंत वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय आयुष्यात काहीच नाही आणि पश्चाताप ही जगाच्या पाठीवर अशी विभूति आहे जी जगुही देत नाही आणि मरू ही देत नाही .
जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच पदरात आहे असं नाही ,पण प्रयात्नावादी माणुस कधी अयशस्वी होत नाही म्हणुन ….. गरुडा कडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्या कडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी , पर्वता कडून निश्चय निर्णयावर ठाम राहण्यासाठी,फुलांकडून सुगंध घ्या दुखातही हसण्यासाठी ,काट्यांकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी , आभालाकडून विशाल सांधे चूका माफ़ करण्यासाठी,वार्याकडून वेग घ्या प्रगति पथावर अग्रेस होण्यासाठी आणि माझ्याकडून शुभेच्या घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी ……!
No comments:
Post a Comment