गावात शवांचा डोंगर गावाला गावपन नाही
श्वासा शिवाय इथेही मुडद्यांना भावपन नाही
श्वासा शिवाय इथेही मुडद्यांना भावपन नाही
गावातील एक पुराणी ती वेसही पडली आता
अन कुजकी माझी कविता शब्दांना नडली आता
मरणाच्या रस्त्या वरच्या माणसांच्या किन्काल्या होत्या
क्षणात आकाशी भिडल्या त्या कालाच्या डरकाल्या होत्या
क्षणात आकाशी भिडल्या त्या कालाच्या डरकाल्या होत्या
गावातील भक्तांनाही देव का भेटला नाही
अन घामाच्या रक्तालाही भाव का भेटला नाही
आरतीच्या घंटेसम तो देवही वागला नाही
दर्ग्यात कंठाला फोडून अल्लाहि भागला नाही
चर्चेतील प्रार्थनेतुन येशुही भेटला नाही
अन स्थितप्रदन्य समाधीतुन बुद्दध ही जागला नाही
पिल्लांच्या आरोळीला अर्थ कुणी द्यावा
माय कुणाची द्यावी बाप कुणाचा द्यावा
काय उगवले होते अन काय उगवनार आता
पाखरांच्या घरट्यावर गिधाडे फुगनार आता
माणसाचे गाठोडे होउन अंगणात केवढे पुरले
घरांचे घरपन जाउन अवशेष तेवढे उरले
भविष्य उद्याचे सांगेल इथे गाव नक्षीदार होता
नक्षिला भक्षी करण्यास " इतिहास साक्षीदार " होता
No comments:
Post a Comment