18 Sept 2011

शेरो शायरी

दोस्ती गझल है गुन गुनाने के लिए
दोस्ती नगमा है सुनाने के लिए
ये वो जस्बा है जो सबको नहीं मिलता
क्योंकि हौसला चाहिए दोस्ती निभाने के लिए !!!  

सौ बेवफाई क़ुबूल हैं एक वफाई के लिए ,
सौ आंसू क़ुबूल हैं एक हसी के लिए ,
हम तो मोहताज हैं आपके दोस्ती के.........
सौ दुश्मनी क़ुबूल हैं आपकी दोस्ती के लिए….. !!!

पत्थर की है दुनिया जज्बात नहीं समजती ,
दिल में क्या है वो बात नहीं समजती
तन्हा तो चाँद भी है सितारों के बीच ,
पर चाँद का दर्द वो रात नहीं समजती.. !!!

दोस्ती एक साहिल है तुफानो के लिए ,
दोस्ती एक आईना है अरमानो के लिए ,
दोस्ती एक मेहफ़िल है अंजानो के लिए ,
दोस्ती एक ख्वाहिश है आप जैसे दोस्तों के लिए. !!

चारोळ्या

प्रेम म्हणजे काय रे ?
दुधा वरची साय रे
थोड़ी उब मिळता
भसकन उतू जाय रे
 
तुझ्या भेटीनंतर सख्या मी
माझी राहिले नाही
आरशात सुद्धा अरे राजा मी
मला पाहिले नाही
 
मूक मूक राहून तुझ
नुसतच पाहत राहन
गोठलेल्या नदीच जस
बर्फा खालून वहान
 
तुलशी पुढे दिवा लावताना तुला
कुंपना बाहेर मी पहिल
पण मी बाहेर येऊ शकले नाही
कारण मधे कुंपण उभ राहिल
 
मरताना वाटल आयुष्य नुसतच वाहून गेल
मला जगायचय मला जगायचय म्हणताना
माझ जगायचच राहून गेल
 
लोकांच अनुकरण करण
मला जमत नाही
वेगळ काही केल तर
ते लोकांना खपत नाही

15 Sept 2011

उखाणे

१ सोन्याच्या सिंहासनावर बसले गणपति राजा
.............. नाव घेते /घेतो पहिला नंबर माझा
२ जाईच्या वेलावर हवा सुटली गार गार
.............. नाव घेता रात्र झाली फार फार 
३ दोन वाती एक ज्योति दोन शिम्पले एक मोती
............. माझे /माझी जीवनसाथी
४ काचेच्या ग्लासात गुलाबाच अर्क
.............. नाव घेतो / घेते तुमच्या मनासारख
५ चांदीच्या तबकात खड़ी साखरेचे खड़े
........... नाव घेते /घेतो गनराजा पुढे
६ श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी
.............. चे नाव घेण्याची ही पहिलीच संधी
७ वसंत रुतुत कोकिला करते कुजन
......... चे नाव घेतो /घेते करते /करतो गणपति पूजन
८ सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली
............ राणी माझी घरकामात गुंतली
९ ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
......... चे नाव घेतो /घेते  तुमच्यासाठी स्पेशल
१० नीलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी
............ चे नाव घेतो / घेते गणपति आले घरी

जीवनात यशस्वी होण्यासाठी

तुम्हास……
               सर्वप्रथम आयुष्यात / जीवनात  यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
               
खरं म्हणजे मी स्वतः खुप मोठी नाहीपण तरीही जीवन यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाशी अशी खुनागाठ बांधावी लागते की यशस्वी झाल्यानंतर ती गाठ आपल्या मनाशी घर करुन असते की ,या निर्धारानेच मी यशस्वी आहे असे आपण म्हणत असतो पण पण तत्पूर्वी ……….
              हाच तो काळ आहे गरुडाचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा , सलसलत्या रक्ताला आणि जीवनाला दिशा देण्याचा ,हाच तो कालखंड . जीवनाचे स्वप्न बघून त्या स्वप्नांना वास्तवात उतरवन्याचा हाच तो काळ आहे . स्पर्धेच्या मैदानात गुनवत्तेचा पराक्रम गाजवन्याचा जो ह्या पराक्रमात तरबेज त्याच्याच गळ्यात विजयाची लक्ष्मी हार घालते. विजयी व्हायचे असेल तर स्वप्नात मश्गुल राहून चालत नाही , जो स्वप्नात मश्गुल राहिला त्याच्या जीवनात शोकांतिका अटल आहे .
            आज स्पर्धेत टिकायाच असेल तर चिखलात फसून चालत नाही त्यासाठी आपल नान आस बनवाव लागतं की ते चिखलात जरी पडलं तरी त्यान टन टन असा आवाज केला पाहिजे  तर आपण उभे राहू
शकतो अन्यथा …….
           जो पर्यंत वेळ आपल्या हातात आहे तो पर्यंत वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय आयुष्यात काहीच नाही आणि पश्चाताप ही जगाच्या पाठीवर अशी विभूति आहे जी जगुही देत नाही आणि मरू ही देत नाही .
           जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच पदरात आहे असं नाही ,पण प्रयात्नावादी माणुस कधी अयशस्वी होत नाही म्हणुन ….. गरुडा कडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्या कडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी , पर्वता कडून निश्चय निर्णयावर ठाम राहण्यासाठी,फुलांकडून सुगंध घ्या दुखातही हसण्यासाठी ,काट्यांकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी , आभालाकडून विशाल सांधे चूका माफ़ करण्यासाठी,वार्याकडून वेग घ्या प्रगति पथावर अग्रेस होण्यासाठी आणि माझ्याकडून शुभेच्या घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी ……!

13 Sept 2011

तुला हसताना पाहिल्यावर


तुला हसताना पाहिल्यावर
माझ्या मनाचे फुलोरे फुलतात

आठवनिंच्या झुल्यावर मग
त्याचेच झूले झुलतात

आता कोठेही गेले
तरी एक पोकली असते

तुझ्या साठीच का तेवढी जागा
माझ्या मनात मोकली असते !!!

मैत्री म्हणजे


मैत्री म्हणजे मायेची साठवण
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो
तो कधी विसरायचा नसतो
ती नाती कधी तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेऊन
फुलपाखरे हातातून सुटून जातात

12 Sept 2011

कुजकी माझी कविता

गावात शवांचा डोंगर गावाला गावपन नाही
श्वासा शिवाय इथेही मुडद्यांना भावपन नाही

गावातील एक पुराणी ती वेसही पडली आता
अन कुजकी माझी कविता शब्दांना नडली आता
मरणाच्या रस्त्या वरच्या माणसांच्या किन्काल्या होत्या
क्षणात आकाशी भिडल्या त्या कालाच्या डरकाल्या होत्या

गावातील भक्तांनाही देव का भेटला नाही
अन घामाच्या रक्तालाही भाव का भेटला नाही

आरतीच्या घंटेसम तो देवही वागला नाही
दर्ग्यात कंठाला फोडून अल्लाहि भागला नाही 

चर्चेतील प्रार्थनेतुन येशुही भेटला नाही
अन स्थितप्रदन्य समाधीतुन बुद्दध ही जागला नाही   

पिल्लांच्या आरोळीला अर्थ कुणी द्यावा
माय कुणाची द्यावी बाप कुणाचा द्यावा

काय उगवले होते अन काय उगवनार आता
पाखरांच्या घरट्यावर गिधाडे फुगनार आता

माणसाचे गाठोडे होउन अंगणात केवढे पुरले
घरांचे घरपन जाउन अवशेष तेवढे उरले 

भविष्य उद्याचे सांगेल इथे गाव नक्षीदार होता
नक्षिला भक्षी करण्यास " इतिहास साक्षीदार " होता

जीवन म्हणजे

जीवन म्हणजे स्वत:स पडलेले कोडे
जीवन म्हणजे आपण शिकलेलेच धडे
जीवन म्हणजे सोबत चालत जाणे वाट
जीवन म्हणजे नकळत हाती धरला हात
जीवन म्हणजे नव्या दिशेचा मागोवा
जीवन म्हणजे जुन्या क्षणांचा परतावा
जीवन म्हणजे रोजच एखादे धाडस
जीवन म्हणजे स्वप्नच एखादे गोंडस
जीवन म्हणजे चेहर्‍यावरती स्मित खुलणे
जीवन म्हणजे नकळत अश्रूंनी भिजणे
जीवन म्हणजे पत्त्यांचे घर रचलेले
जीवन म्हणजे हवेतले काही मजले
जीवन म्हणजे वेचत जाणे काही क्षण.....