30 Sept 2013

चित्र कविता








पाउस

पहिल्या पावसाचा पहिलाथेंब
जणू खुशाली तुझी सांगून गेला
प्रसन्न प्रफुल्लीत सारा आसमंत
विरह वेदना मात्र वाढवून गेला................


तुला पाहील होतं
पहिल्या पावसात भिजताना,
मन चिंब भिजुन गेलं होतं
तुला वेड्यासारखं पाहताना..............

मैत्री


मैत्री

 



जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
... न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री"......!!!!

चहा

 

 तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
कडू चहात गोडवा येतो...
साखर घातलेला चहाही मग तुझ्या
ओठांशिवाय कडवा होतो..................




चारोळ्या

 




आठवणी सांभाळणे सोपे असते
मनात त्या जपून ठेवता येतात
पण क्षण सांभाळणे फार अवघड असते
कारण क्षणात त्यांच्या आठवणी बनतात......................






 


मला मेघाचा पत्ता हवाय
पावसाला घेउन ये सांगायचय
अंगणातल्या निशिगंधावर
बरसून दया कर विणवायचय.......................

 





असावी तुझ्या माझ्या
प्रेमाची सुंदर अशी गोष्ट...
एकमेकांच्या डोळ्यांमध्ये
ती दिसावी स्पष्ट..................

चारोळ्या




चारोळ्या


 



मी मुद्दामच छत्री आणत नाही
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले की,
तू छत्रीत घेणार म्हणून.......................




 
  


सहसा दाखवत नाही, मी कोणाला
माझा दुःखात बूडालेला चेहरा...
लोकं मात्र विचारत राहतात,
तू नेहमीच कसा रे हसरा?...................


 




 
 



प्रेम म्हणजे केली तर मस्करी
मांडला तर खेळ, समजली तर भावना
ठेवला तर विश्वास, घेतला तर स्वास
रचला तर संसार, निभावल तर जीवन....................


दुनिया

 
सभी को सब कुछ नही मिलता
नदी कि हर लहेर को साहिल नही मिलता
ये दिल वालो कि दुनिया है दोस्त
किसीसे दिल नही मिलता तो कोई दिल से नही मिलता ………….





   

  
 रास्ते में न बैठो हवा तंग करेगी
 गुजरे हुए लम्हो कि याद सदा तंग करेगी
 न चाहो किसी को आघाजे सफर में          

 अगर रुठ गये तो हर एक अदा तंग करेगी.......................

तू

मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यात बसवू पाहतो...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
मला तुझ्यासमोर कमीच वाटतो..............


तू नसलीस की, सगळे
असून नसल्या सारखे...
माझ्या कवितेतील सारेच
शब्द संपल्या सारखे....................

प्यादं

             जगाच्या या पटावरती एक प्यादं चालत होतं, नजरा चुकवत सर्वांच्या लक्षआपल गाठत होतं, शेवटच्या घरात आलं तेव्हा प्याद आता वजीर होतं,
बेफानताकद घेउन राजालाही नाचवतं होतं,
मात झाली खेळ संपला पण प्यादं आपल्याचं नशेत होतं,
नवा डाव मांडला तेव्हा प्यादं पुन्हा
प्यादंच होतं.....

प्रेम

प्रेम नसावे कापरासारखे
झुर्कन उडून जाणारे
प्रेम असावे अत्तरासारखे
आयुशाभर दरवळत राहणारे

प्रेम नसावे भून्ग्यासारखे
एका फुलावरून दुसर्या फुलावर जाणारे
प्रेम असावे फुलपाखरासारखे
उडूनही फुलावर स्वतःचा रंग ठेवणारे


प्रेम नसावे पानासारखे
वार्याबरोबर वाहत जाणारे
प्रेम असावे वार्यासारखे
स्वतःच्या मनानुसार स्वच्छंद वागणारे

प्रेम नसावे माशासारखे
तलावाच्या सुकन्याने दुसर्या
तलावाकडे जाणारे प्रेम असावे कमळाच्या
फुलासारखे तलावाच्या
सुकन्याने तिथेच कोमेजून प्राण देणारे

प्रेम नसावे ओळखीसारखे
काही क्षणांच्या विरहाने विस्तृत होणारे
प्रेम असावे आठव्निसारखे
हृदयाच्या एखाद्या कोपर्यात निरंतर राहणारे !!!