6 Aug 2016

शून्य

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

नंबर नऊ ने नंबर आठ ला चापट मारली.......
नंबर आठ रडायला लागला
नंबर आठ ने नंबर नऊला विचारले
दादा मला का मारले......??
नंबर नऊ त्याला म्हणाला मी मोठा  म्हणून तुला मारले......
हे ऐकून नंबर आठ ने नंबर सात ला चापट मारली
आणि जी गोष्ट नंबर नऊ ने नंबर आठला सांगितली
तीच त्याने सातला सांगितली .......
नंतर सात ने सहाला....., सहा ने पाचला ....,
पाच ने चार ला......... , चार ने तीन ला ......,
तीन नर दोन ला ....... आणि दोन ने एक ला चापट मारली,
पण नंबर एक बिचारा कोणाला काहीही बोलला नाही,
कारण तो हुशार होता.... त्याच्या खाली शून्य होता
त्याने त्यालाही चापट मारली नाही.
उलट त्याला उचलून आपल्या शेजारी बसवलं
व आपली टाकत वाढवली.
आता नंबर एक ची ताकत दहा झाली........
असे असंख्य शून्य आपल्या आजूबाजूला असतात .
नेहमीच तो लहान आहे, गरीब आहे .....
म्हणून त्याला कमी लेखू नका .......
तोच शून्य एकाची किंमत दहा करू शकतो....... !!!


No comments:

Post a Comment