झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा !!धृ!!
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा !!१!!
ढोल नगारे घुमू द्या कडे झडती आज चौघडे
शिवनेरीच्या सदरे वर भगवा झेंडा फडफडे
तना मनाचे झिरे हरखले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा !!२!!
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा !!धृ!!
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा !!धृ!!
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
राजस रूपड डोई टोपड पाहून सुटतो चाळा
लिंब लोण उतरा गं लवकर दृष्ट लागलं बाळा
कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा !!१!!
ढोल नगारे घुमू द्या कडे झडती आज चौघडे
शिवनेरीच्या सदरे वर भगवा झेंडा फडफडे
तना मनाचे झिरे हरखले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा !!२!!
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा !!धृ!!
No comments:
Post a Comment