26 Mar 2018

गोंधळ

         अवघड आहे बाबा.... अवघड आहे ...... खरंच अवघड आहे पण कुणी केलं अवघड आपणंच ना ....? किती वाद किती मोर्चे,किती उपोषण, निषेध, बहिष्कार कशासाठी हे सगळं नाही का शांततेनं आणि सुखानं राहू शकत आपण... ..... .? कुणी भाषेसाठी भांडतंय , कुणी जातीसाठी, कुणी धर्मासाठी, कुणी प्रांतासाठी, कुणी अट्रोसिटी साठी, कुणी लोकपालसाठी तर कुणी आरक्षणासाठी कशाकशा साठी भांडतोय आपण.......गोंधळ माजलाय नुसता देशात पण आणि डोक्यात पण............  पण जेव्हा आपल्या सैनिकांवर हल्ले होतात कितीतरी सैनिक मारले जातात तेव्हा का आपण भांडत नाही, मोर्चे काढत नाही,बंद पुकारत नाही, उपोषणाला बसून सरकार वर दबाव आणत नाही याचा बदला घेण्यासाठी....."जरा याद करो कुर्बानी "- सारखी गाणी फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आठवतात आपल्याला  वर्षभर त्यांच्या जीवावर झोप काढतो आपण......  फक्त एकदा विचार करा त्यांनी बंद पुकारला तर ...... आज आपण  प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करतोय स्वतःच्या जातीचा, धर्माचा, भाषेचा, फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा..... देशाचा विचार कुणी करायचा मग...... तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांनी जर फक्त स्वतःचा विचार केला असता न तर आजही आपण इंग्रजांच्या हवाली असतो आणि मग कदाचित आपल्याला हा शहाणपणा सुचला नसता.......

" कभी नोटोंके लिये मरे, कभी वोटोंके लिये मरे.....
कभी जात पात के नाम पर मरे ........
अगर होते वीर भगतसिंग तो कहते -
"यार सुखदेव हम भी किन लोगोंके लिये मरे ........!!!"

No comments:

Post a Comment