सकाळी आवरून ऑफिसला जायला निघाले, क्रांती चौकातला सिग्नल लाल वरून हिरवा झाला आणि मी माझी गाडी दामटली, पुलाखालून पुढे जाताना आकाशवाणी कडून येणारा एक ऑटो वाला डायरेक्टच पुढे आला आणि वर तोंड करून मलाच म्हणतोय ओ मॅडम बघून चालवा की, माझं डोकंच सरकलं, मग मी बोलले - " ए कुणाला शिकवतोय तू ? सिग्नल बघ आधी ...." तो त्याची चूक मान्य करायला तयारच नव्हता. मग मी तरी का माघार घ्यावी तेही माझी काहीच चूक नसताना. जवळ पास १० मिनिट आम्ही हुज्जत घालत होतो, आता बरेच लोक आजूबाजूला उभे राहून बघत होते, कुणी बघून पुढे जात होते.... तोही ऐकायला तयार नव्हता आणि मी पण, बरंच ट्रॅफिक थांबलं मग कुठून एक ट्रॅफिक पोलीस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला-
"ओ ताई जाऊ द्याना जा तुम्ही." मी - "अहो त्याला बोलायचं सोडून तुम्ही मला काय जायला सांगताय चूक त्याची आहे माझी नाही. " आम्ही ऐकत नाही असं पाहून तो आम्हाला म्हणाला - " तुम्ही एक काम करा दोघ, गाड्या साईडला घेऊन भांडा....."
आता आम्ही दोघ हसलो एकमेकाला टाळी दिली आणि आपआपल्या गाड्या स्टार्ट करून तिथून निघून गेलो,
आता मागे उभे असलेलं पब्लिक , तो पोलिसवाला पण तोच विचार करत होते जो आता तुम्ही करताय .........?
😃😃😃😃वो कौन था ....?
No comments:
Post a Comment