14 Jan 2015

प्रेम

श्वासाला गरज असते फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची,
जगण्याला गरज असते पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची,
प्रेमाला गरज असते भावनेची
नव्हे वारंवार भेटण्याची
प्रेम असंच करायला हवं
कि गरजचं उरणार नाही
पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची …………

1 comment:

  1. फार छान.
    पण असे राहणे/वागणे शक्य आहे काय ?
    हृदयाला चांगले वाटते पण मनाचे काय ते तर काही ऐकतच नाही .

    ReplyDelete