
ज्या अनेक बेभान करणार्या गोष्टी आजूबाजूला होत्या त्या सगळ्यांचा विसर पडावा इतकी ती सुंदर होती. नजर फिरून फिरून तिच्या कडेच वळत होती, तिची माझी ओळख नव्हती,पण हातांच्या हालचालीने होणार्या बांगड्याच्या आवाजानं…………. त्याचं एका नादाची ओढ लागली होती. अवघं आसमंत तिने व्यापून टाकलं होत, माझ्या सकट सगळ विश्व तिच्यासमोर गहाण पडलं होत. काळ्या सावल्या ढगांकडे पहावं कि तिचे नेत्र पाहावेत, पावसाळी गूढ हवा पहावी कि तिचं गूढ अनामिक व्यक्तिमत्त्व पहावं, हिरव्यागार शालू नेसलेल्या जमिनीकडे पहावं कि तिच्या शितल वाहणार्या अस्तित्वान बेभान व्हावं……………छे …!………. आज सगळीच उत्तर हरवली होती.