26 Dec 2012

माझ्या प्रिय मित्रा,

माझ्या प्रिय मित्रा,
             सप्रेम नमस्कार ....................
पत्रास कारण की, आमच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त तू पाठवलेला मौल्यवान आहेर मिळाला,मौल्यवान यासाठी की तुझ्या या वस्तू मुळे माझा जो चुकीचा ग्रह झाला होता तो मोडला आणि वास्तवतेची जाणीव ठेवून मी माझा निर्णय बदलण्याचा विचार केला. माझा मुलगा चि प्रशांत तसा तो लहान पणापासूनच खूप बंड आहे , कुठल्याही गोष्टीला किंवा काहीही करायला तो बिलकुल घाबरत नाही खूपच डांबिस पणा करतो. चालताना पण निट चालणार नाही कुणाची काही पण खोडी काढील.त्याचे रंग बघून मला अस वाटलं कि याच्या अंगात जो आडदांड पणा आहे त्याचा सदुपयोग कसा करता येईल जेणे करून त्याचा हि निरस होणार नाही. त्याची तब्येत आणि उंची दोन्ही पण चांगले म्हण किंवा उत्तम म्हण असे आहेत त्यामुळे आम्ही विचार केला कि  पुढे चालून याला आपण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA ) ला पाठवू म्हणजे त्याची ताकत वायफळ गोष्टीत वय जाणार नाही. NDA चा अभ्यास क्रम हा केंद्र सरकार च्या अखत्यारीत येत असल्याने संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून दिले जाते व त्याची प्रवेश परीक्षा हि संपूर्णतः इंग्रजी तूनच असते त्या तयारी च्या हिशोबाने आम्ही विचार केला कि त्याला आपण मिलिटरी शाळेत टाकूया पर्यायाने इंग्रजी मध्यम जेणे करून तिथे त्याची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक तयारी आपोआपच करून घेतली जाईल.ह्या दृष्टीने आम्ही त्याला इंग्रजी माध्यमात घालणार होतो जरी तो खर्च खिशाला परवडणारा नसला तरी, परंतु पाठवलेल पुस्तक वाचून विचार केला आज अशी किती तरी मुल आहेत की जी मराठी माध्यमात शिकून ज्यांनी NDA मध्ये प्रवेश मिळवला आहे. हा का नाही मिळवू शकणार जर खरंच त्याची इच्छा असेल तर तो मराठी माध्यमात शिकून सुद्धा NDA ला प्रवेश मिळवू शकतो. पण जर त्याची इछाच नसेल तर तो इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा NDA मध्ये प्रवेश घेऊ शकणार नाही मग त्याचा खूप त्रास होईल आम्हाला वाटेल कि साहजिकच न परवडणारा खर्च करायचा म्हणजे आपली हौस मौज बाजूला ठेवूनच आणि हे सगळ करून जर इच्छित साध्य झाल नाही तर त्रास हा होणारच मग त्याचा ताण आम्ही पर्यायाने त्याच्यावर काढणार आणि त्याचा परिणाम नात्यावर होणार. त्याच्या जागी राहून विचार केला तर त्याची इच्छा नसताना त्याला ते करावे लागणार परिणामी तो आमच्या पासून दुरावेल.म्हणून आम्ही विचार केलाय कि त्याला मराठी माध्यमात च घालायचं आपली हौस मौज पण भागवायची उद्याच कोणी पाहिलं.म्हणजे त्यानी आपल्या मनासारखं केल किंवा नाही केल तरी जास्त त्रास होणार नाही.मराठी माध्यमात टाकण्या मागे अजून एक उद्देश आपण सांगू शकतो तो म्हणजे जेव्हा आपण मुलाला मराठी माध्यमात घालतो तेव्हा दहावी बारावी पर्यंत आपण त्यांना अभ्यासात सहज मदत करू शकतो कारण तो अभ्यास क्रम आपल्या हाताखालून गेलेला असतो आणि आपण मुलांवरती लक्ष हि ठेवू शकतो जेणे करून मुलं अभ्यासाच्या नावाखाली कुठली पुस्तक वाचतात वगैरे आणि मुलांना पण धाक असतो आणि जेव्हा आपण त्यांना अभ्यासात मदत करतो तेव्हा त्यांचा आपल्याविषयी चा आदर अजून वाढतो त्यांच्या मनात आपली एक वेगळी प्रतिमा तयार होते कि नाही माझ्या आई ला किंवा बाबांना सगळ येत, पण तेच जर आपण मुलांना इंग्रजी माध्यमात टाकल तर फारतर तिसरी किंवा चौथी पर्यंत आपण त्यांचा अभ्यास मोठ्या मुश्किलीने घरी घेऊ शकतो पण त्या नंतर त्यांचा अभ्यास आपल्याला घरी घेतायेन शक्य नसत कारण तिथून पुढंच इंग्रजी म्हणजे थोड जास्त हाय लेवलच असत मग साहजिकच पर्यायाने शिकवणीचा खर्च करावा लागतो अन तो करून पण एखाद्या वेळेस जर मुलांना काही नडल  आणि त्याने विचारलं व आपण सांगू शकलो नाही तर त्याचा गैरसमज होतो कि आपल्या आई ला किंवा बाबांना काही येत नाही व त्याच्या मनात आपल्या विषयी आदर राहत नाही तसेच इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले अभ्यासाच्या नावाखाली कुठली पुस्तके वाचताहेत किंवा काय करताहेत हे कळण पण थोड मुश्किल होऊन जात. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते कि माझी मुलगी कु प्रांजल मराठी माध्यमात शिकते जर मी प्रशांतला इंग्रजी माध्यमात घातलं असत भले त्या मागे आमचा दुजाभाव करण्याचा कुठलाही हेतू नव्हता तरी तिचा गैरसमज होऊ शकला असता व तिच्या मनात आमच्या विषयी आदर राहिला नसता. आनंद मी व संतोष माने तुझे खूप खूप आभारी आहोत कि तू आम्हाला एक चूक करण्यापासून वाचवलस. जसा तू आमचा  निर्णय बदलण्यात यशस्वी झालास तसा अनेकांचे निर्णय बदलण्यात तुला यश येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना व तुझ्या ह्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा...................!!!


टिप :- मराठी व्याकरण कच्चे असल्यामुळे शुद्धलेखनात बर्याच चुका असतील त्याबद्दल क्षमस्व.




                                                                                                                  तुझीच मैत्रीण   
                                                                                                          सौ रोहिणी संतोष माने
                                                                                                                 औरंगाबाद
 

No comments:

Post a Comment