आदरणीय साहेब,
पत्र लिहीताना काय मायना लिहावा असा मोठा प्रश्न पडला होता, पण तुम्ही जे कार्य केलय ते आदर वाढवणारंच आहे म्हणून आदरणीय. सर्वप्रथम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची ओळख आम्हाला करून दिल्या बद्दल तुमचे शतश: आभार.
खूप दिवसापासून पत्र लिहिण्याचा विचार होता पण राहून जायचं पण आज तुमचा मेल id मिळाला आणि परत एकदा तुमचे आभार मानण्याचा मनसुबा मनानी व्यक्त केला. खरंच डॉक्टर साहेब तुमचे कसे आभार कसे मानावे तेच कळतं नाही. आता तर स्वतःची लाज वाटू लागलीये कि इतका सूर्यासारखा तेजस्वी निर्मळ मनाचा माझा राजा आणि त्याच साधं चरित्र आपल्याला माहिती असू नये, छत्रपती शिवरायांवर भर भरून बोलायचो आम्ही आमचे राजे असे आमचे राजे तसे पण संभाजी महाराज त्यांच्या बद्दल काहीच माहिती नव्हतं ते शिवाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र होते त्यांना औरंगजेबाने कैद करून मारलं या पलीकडे काहीच माहिती नव्हतं, मग ते मुघलांना जाऊन मिळाले दिलेर खानाकडे गेले, त्यांनी बाया नाचवल्या दारू पिले, संभाजी महाराज रंगेल होते अशा भाकड कथा ऐकायला मिळायच्या, खरा इतिहास आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न च केला नाही आम्ही, किती नालायक होतो आम्ही, आजूबाजूचे काही दरिद्री लोक माझ्या राजाची मनात येईल तशी बदनामी करत होते आणि आम्ही दळभद्र्य सारखे ऐकत होतो, पण आता तस होणार नाही कारण आता मालिका बघितलेला माझा १० वर्षाचा मुलगा पण छाती ठोकून संभाजी महाराजांबद्दल बोलतोना तेव्हा उर अभिमानानं भरून येतो हे शक्य झालं ते केवळ तुमच्यामुळे. राणूअक्कांचं तर नाव पण माहिती नव्हतं आम्हाला, शेवटी कितीही झालं तरी त्यांच्याही अंगात छत्रपतींचच रक्त त्याही तितक्याच तेजस्वी ओजस्वी, खरंच बहीण असावी तर अशी, खऱ्या अर्थाने पाठ राखण केली राणूअक्कांनी शंभूराजांची.
अजून एक गोष्ट मालिका पूर्ण नाही बघू शकलो माफ करा शेवटचे काही भाग बघण्याची हिम्मतच झाली नाही ओ, खूप प्रयत्न केला पण नाही जमलं डोळ्या देखत माझ्या राजा वर झालेले वारं बघणं सोपं नव्हतं आणि कितीही प्रयत्न केलं;या तरी शक्य नव्हतं.
तुमच्या अमूल्य वेळातून वेळ काढून तुम्ही माझं पत्र वाचलंत, खरे शंभू राजे कसे दिसत होते माहित नाही पण तुमच्या रूपात आम्हाला ते दिसले तुमच्यातल्या त्या शंभू राजांना एकदा प्रत्येक्ष मुजरा करण्याची मना पासून इच्छा आहे ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल पण सध्या पत्रातुनचं
त्रिवार मानाचा मुजरा राजं......!!!
आपलीच शिवशंभू प्रेमी
सौ. रोहिणी संतोष माने
औरंगाबाद