
मी तर म्हणते लग्नाला १० वर्ष झालेल्या प्रत्येक जोडप्याने परत एकदा हनिमून ला जावं, हनिमून म्हणजे फक्त सेक्स हि संकल्पना चुकीची ठरावी, ८ - १० वर्षाच्या एकमेकांच्या सोबतीत अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला तिला/ त्याला सांगायच्या असतात, कधी तिला त्याच्या कुशीत शिरायचं असतं , तर कधी त्याला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं असतं, तिला वाटत असतं त्यानं तीच भर भरून कौतुक करावं "किती ग करतेस तू माझ्या साठी आपल्या कुटुंबासाठी", त्याला वाटत तिनं मी न सांगताच सगळं समजून घ्यावं, पण काय हरकत आहे बोलायला कधी त्यानं बोलावं तर कधी तिने शांत राहून सगळं समजून घ्यावं. कधी तो चुकतो तर कधी ती पण आपण माफी मागत नाही शेवटी इगो महत्वाचा, आपल्या हे लक्षात येत नाही कि सॉरी ह्या एका शब्दाने तो किंवा ती आपल्यात पूर्णपणे विरघळून जाते,बसावं एकमेकांच्या जवळ आजवर जे जे बोललो नाही ते सगळं बोलावं काही चुकलं असेल ते सांगावं, आवडलं असेल नसेल ते हि सांगावं, प्रामाणिक पने जेव्हा आपण एखादी गोष्ट कबुल करतो ना तेव्हा समोरची व्यक्ती हि आपल्याला तेवढ्याच निरागसपने माफ करते, अहो हे सगळं सोडा आज वर च्या आयुष्यात किती वेळेस आपण आपल्या प्रेमाची कबुली दिलीये .......? नाही ना मग तीही द्यावी ........ काय हरकत आहे, देर आए दुरुस्त आए......