आदरणीय
शाळा,
हे
पत्र त्या प्रत्येक
शिक्षकासाठी आहे जे
माझ्या लेकीला ज्ञानरूपी अमृत
पाजतात, हे पत्र
शाळेतल्या त्या प्रत्येक
व्यक्तीसाठी ( शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी
) आहे जे शाळेतल्या
५ तासात माझ्या
लेकीची काळजी घेतात, हे
पत्र शाळेतल्या त्या
प्रत्येक सजीव निर्जीव
घटकाला आहे ज्यांच्या
सहवासात माझी लेक
वावरते,
हे
सगळे जिथे माझ्या
लेकीला भेटतात ते ठिकाण
म्हणजे शाळा आणि
म्हणूनच आदरणीय शाळा........
मुलगी
झाली तेव्हा क्षणभरासाठी
का होईना माझ्याही
मनाची चलबिचल झाली,
पण नंतर विचार
केला शिवाजी राजे
घडले कारण जिजाऊ
जन्माला आल्या, शिवाजी तर
सर्वांनाच घडवायचेत पण देवानं
मला संधी दिलीय
एक जिजाऊ घडवण्याची.
शाळेच्या
प्रत्येक शिक्षकाला माझी हात
जोडून विनंती आहे,
तुम्ही माझ्या लेकीला असं
शिक्षण द्या कि
तिच्या हातून ह्या देशाची
मातृभूमीची सेवा घडेल,
तुम्ही कल्पना चावलाची कर्तबगारी
तिच्यात भरा, स्वतःच्या
प्राणांचे बलिदान देऊन इतरांचे
रक्षण करणाऱ्या नीरजा
भनोतची कर्तव्यनिष्ठा तिला शिकवा,
शहिद संतोष महाडिक
यांच्या पत्नी लेफ्टनंन स्वाती
महाडिक यांचं देशप्रेम तिला
दाखवा, आज जगाच्या
बाजारात अशी कुठलीच
गोष्ट नाही जे
स्त्री करू शकत
नाही, ती मुलापेक्षा
कमी नाही, हे
तिला शिकवा. राष्ट्रपती
प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं तिने
प्रतिभावान व्हावं, इंदिरा गांधी
सारखं बाणेदार व्हावं,
कधी झाशीच्या राणीसारखं
लढाऊ व्हावं, तर
कधी सावित्रीबाई फुले
सारखं सहनशील व्हावं
आणि वेळ प्रसंगी
सिंधुताई सपकाळांसारखं मायाळूही व्हावं इतकीच
माझी इच्छा आहे,
एक दिवस असा
उगवावा कि तिने
मला म्हणावं -
हमसे ना तू खाने की न पीने की बात कर,
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!
खुद्द दर्द की दवा हो, औरोसे ना दवा ले,
सोफे पे मत पडे पडे पंखे कि हवा ले.....
मेहनत से बनने वाले पसीने की बात कर.....
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!
जिस मातृभूमी के तू अरे गोद में पला,
जिसके पवित्र धूल में घुटनों के बल चला....
उसके फटे आंचल को तु सिने की बात कर....
मर्दो की तरह दुनिया मे जीने की बात कर ......!!
हे
शिकवा ते शिकवा
सगळं तुम्हीच शिकवा
असं मी मुळीच
म्हणणार नाही, माझ्या परीने
मीही प्रयत्न करणारच
आहे फक्त त्यात
तुमचा हातभार लागावा
अशी माझी इच्छा.
ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला माठाचा
आकार देण्यासाठी फिरत्या
चाकाची गरज असते
तेवढीच गरज असते
कुंभाराच्या हाताच्या स्पर्शाची, माझ्या
लेकीला घडवण्यासाठी मी फिरत
चाक व्हायला तयार
आहे गरज आहे
ती फक्त तुमच्या
स्पर्शाची......
जीवनात
यशस्वी होण प्रत्येकाच्याच
पदरात आहे अस
नाही पण प्रयत्नवादी
कधी अयशस्वी होत
नाही म्हणूनच .................... माझ्या लेकीला
गरुडाचे पंख द्या
भरारी मारण्यासाठी ,सूर्याचे
तेज द्या अंधाराच्या
नाशासाठी, पर्वताचा निश्चय द्या
निर्णयावर ठाम राहण्यासाठी,
फुलांचा सुवास द्या दुखाःत
सुद्धा हसण्यासाठी,काट्याची धार
द्या अन्यायाच्या नाशासाठी,
आभाळाचे विशाल सांधे चुका
माफ करण्यासाठी, वार्याचा
वेग द्या प्रगती
पथावर अग्रेस होण्यासाठी
आणि तुमच्याकडून शुभेच्या
द्या यशस्वी होण्यासाठी
....... यशस्वी होण्यासाठी .
आपली विश्वासू
सौ रोहिणी संतोष माने