20 Oct 2016

तप्तपदी

वधूने शालू नेसलेला असतो.
वराने उपरणं पांघरलेलं असतं.
त्यामुळे ते उपरणं तो केव्हाही उतरवू शकतो.
वधूला ते उपरणं गाठीसकट सांभाळावं लागतं.
ते उपरण्याचं ओझं झटकून टाकायचं तिने ठरवलं
तर अजूनही ह्या समाजात तिला जबर किंमत मोजावी लागते.


" सखा सप्तपदी भव " - एका ओळीच्या ह्या
अष्टाक्षरी कवितेतल्या "सखा" ह्या शब्दाचा अर्थ
 ज्या ज्या पुरुषांना समजला ,
त्या त्या संसारांच्या बाबतीत सात पावलांनी स्वर्ग पृथ्वीवर अवतरतो.
उरलेल्या संसारांची असते ती - "तप्तपदीच "


- व पु काळे